Breaking News
रत्नागिरी : विषारी औषध सेवन केलेल्या करबुडे येथील 55 वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू संगमेश्वर : एसटी स्थानकाजवळ पुलाखाली बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या व्यक्तीचा मृत्यू रत्नागिरी : ब्राऊन हेरॉईनसदृश अंमली पदार्थासह दोघांना अटक, 2.40 लाखांचा मुद्देमाल जप्त, कोकणनगर-शिवरेवाडी मार्गावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मोठी कारवाई चिपळूण : पालकमंत्री उदय सामंत आज चिपळूण दौऱ्यावर, वाशिष्ठी नदीतील गाळ उपशाचा घेणार आढावा, दुपारी शासकीय विश्रामगृहात विशेष बैठक रत्नागिरी : शहराचा दर सोमवारी पाणीपुरवठा बंद, पाणी कपातीचे धोरण पुन्हा लागू, शीळ धरणातील पाणीसाठ्याचे नियोजन करण्यासाठी प्रशासनाचा निर्णय

रत्नागिरी : विषारी औषध सेवन केलेल्या करबुडे येथील 55 वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू

banner 468x60

रत्नागिरी तालुक्यातील करबुडे येथे राहत्या घरासमोर विषारी औषध सेवन केलेल्या ५५ वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान कोल्हापूर येथे मृत्यू झाला. विजय कृष्णा मोहिते (वय ५५, रा. करबुडे, ता. जि. रत्नागिरी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ही घटना ३१ ऑक्टोबर रोजी घडली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, ३१ ऑक्टोबर रोजी विजय मोहिते यांनी राहत्या घरासमोर दारूच्या नशेत विषारी औषध सेवन केले. त्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृतीच्या पुढील उपचारांसाठी त्याच दिवशी त्यांना कोल्हापूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले होते.

त्यांच्यावर उपचार सुरू असताना ५ नोव्हेंबर रोजी पहाटे एक वाजण्याच्या सुमारास वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. याबाबतची माहिती डॉक्टर कुणाल भांडूरे यांनी दिलेल्या एमएलसी अहवालावरून रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याला प्राप्त झाली.

या प्रकरणी १६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४.२२ वाजता रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक १०६/२०२६, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १९४ अन्वये नोंद करण्यात आली आहे. विजय मोहिते यांच्या मृत्यूची नोंद करून पोलीस पुढील कार्यवाही करीत आहेत.