राज्याचे उद्योग, गुंतवणूक, सेवा व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत आज, मंगळवार १७ नोव्हेंबर रोजी चिपळूण दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात वाशिष्ठी नदीसह रत्नागिरी जिल्ह्यातील अन्य नद्यांमधील गाळ उपशाबाबत आयोजित विशेष आढावा बैठकीला ते उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे वाशिष्ठी नदीतील गाळ उपशाच्या कामासंदर्भात या बैठकीत काय चर्चा होते, याकडे चिपळूणकरांचे लक्ष लागले आहे.
प्राप्त दौऱ्याच्या कार्यक्रमानुसार, दुपारी २.३० वाजता पालकमंत्री डॉ. उदय सामंत मुंबई येथून हेलिकॉप्टरने सावर्डेकडे प्रयाण करतील. दुपारी ३.३० वाजता सह्याद्री शिक्षण संस्था, सावर्डे येथील हेलिपॅडवर त्यांचे आगमन होईल. त्यानंतर ते मोटारीने चिपळूण येथील शासकीय विश्रामगृहाकडे रवाना होतील.
दुपारी ४ वाजता शासकीय विश्रामगृह येथे वाशिष्ठी नदीतील तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील इतर नद्यांमधील गाळ काढण्यासंदर्भात विशेष आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत नदीतील गाळ उपशाच्या कामाचा आढावा आणि संबंधित विषयांवर चर्चा होणार आहे.
यानंतर सायंकाळी ५ वाजता पालकमंत्री गोवळकोट येथे आयोजित शेतकऱ्यांना बीज वाटप कार्यक्रमाला उपस्थित राहतील. हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त चिपळूण शिवसेनेच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. चिपळूण नगरपरिषदेचे नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्या संदर्भाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
त्यानंतर सायंकाळी ७ वाजता अलोरे येथील करमणूक केंद्रात विनोद झगडे यांच्या सुवर्णमहोत्सवी वाढदिवसानिमित्त आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्याला डॉ. सामंत उपस्थित राहणार आहेत.
दौऱ्यातील सर्व कार्यक्रम आटोपल्यानंतर रात्री १२.५० वाजता चिपळूण रेल्वे स्थानकावरून कोकणकन्या एक्स्प्रेस (गाडी क्रमांक २०११२) ने ते मुंबईकडे प्रयाण करणार आहेत.
पालकमंत्र्यांच्या या दौऱ्यात वाशिष्ठी नदीतील गाळ उपशाच्या प्रश्नावर होणाऱ्या आढावा बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













