Breaking News
रत्नागिरी : विषारी औषध सेवन केलेल्या करबुडे येथील 55 वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू संगमेश्वर : एसटी स्थानकाजवळ पुलाखाली बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या व्यक्तीचा मृत्यू रत्नागिरी : ब्राऊन हेरॉईनसदृश अंमली पदार्थासह दोघांना अटक, 2.40 लाखांचा मुद्देमाल जप्त, कोकणनगर-शिवरेवाडी मार्गावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मोठी कारवाई चिपळूण : पालकमंत्री उदय सामंत आज चिपळूण दौऱ्यावर, वाशिष्ठी नदीतील गाळ उपशाचा घेणार आढावा, दुपारी शासकीय विश्रामगृहात विशेष बैठक रत्नागिरी : शहराचा दर सोमवारी पाणीपुरवठा बंद, पाणी कपातीचे धोरण पुन्हा लागू, शीळ धरणातील पाणीसाठ्याचे नियोजन करण्यासाठी प्रशासनाचा निर्णय

रत्नागिरी : ब्राऊन हेरॉईनसदृश अंमली पदार्थासह दोघांना अटक, 2.40 लाखांचा मुद्देमाल जप्त, कोकणनगर-शिवरेवाडी मार्गावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मोठी कारवाई

banner 468x60

रत्नागिरी शहरातील कोकणनगर ते शिवरेवाडी मार्गावर अंमली पदार्थांची विक्री करण्याच्या उद्देशाने ब्राऊन हेरॉईन (टर्की) सदृश अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे. सोमवारी, १६ नोव्हेंबर रोजी दुपारी ३.४० वाजण्याच्या सुमारास अजिजा बिल्डिंगच्या बाजूला ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत ४ ग्रॅम वजनाचा अंमली पदार्थ, दोन मोबाईल आणि पल्सर मोटारसायकल असा एकूण २ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

नायाब इरफान खलपे (वय २७, रा. कीर्तीनगर, मजगाव रोड, रत्नागिरी) आणि अरबाज अबरार फकीर (वय ३०, रा. उक्ताड फकीर मोहल्ला, चिपळूण) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने कोकणनगर ते शिवरेवाडी मार्गावर अजिजा बिल्डिंगच्या बाजूला कारवाई केली. यावेळी दोन्ही संशयितांकडे ब्राऊन हेरॉईन (टर्की) सदृश अंमली पदार्थ आढळून आला. हा पदार्थ विक्रीच्या उद्देशाने बेकायदेशीररीत्या ताब्यात ठेवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

पोलिसांनी केलेल्या जप्तीमध्ये पारदर्शक प्लास्टिक पिशवीत ठेवलेला ब्राऊन हेरॉईनसदृश पदार्थ आढळला. प्लास्टिक पिशवीसह त्याचे वजन ७.५ ग्रॅम, तर निव्वळ वजन ४ ग्रॅम असल्याचे नोंदीत नमूद आहे. या पदार्थाच्या एकूण १०० पुड्या तयार करण्यात आल्या होत्या. याशिवाय पदार्थ ठेवण्यासाठी वापरलेल्या दोन रिकाम्या प्लास्टिक पिशव्या आणि पुड्या बांधण्यासाठी वापरलेले १०० कागदाचे तुकडेही जप्त करण्यात आले.

या कारवाईत वनप्लस नॉर्ड सीई २ आणि ओप्पो ए५५ या कंपन्यांचे प्रत्येकी एक मोबाईल हँडसेट, तसेच एमएच ०८ एय ३६९२ क्रमांकाची काळ्या रंगाची बजाज पल्सर २२० मोटारसायकल जप्त करण्यात आली. जप्त केलेल्या सर्व मुद्देमालाची एकूण किंमत २ लाख ४० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस हवालदार गणेश राजेंद्र सावंत यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४६८/२०२६ अन्वये एनडीपीएस कायदा १९८५ मधील कलम ८(क), २१(अ) आणि २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही संशयितांना १६ नोव्हेंबर रोजी रात्री १०.३९ वाजता अटक करण्यात आली असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.