रत्नागिरी शहरातील राजीवडा बांध परिसरात घराजवळील बांधकामाच्या ठिकाणी झाडू मारून स्वच्छता करणाऱ्या ४८ वर्षीय व्यक्तीवर अचानक चाकूसदृश धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. या हल्ल्यात संबंधित व्यक्ती जखमी झाली असून, याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात एका संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास राजीवडा बांध येथील घर क्रमांक ११२ जवळ ही घटना घडली. अब्दुल रशिद मजिद वस्ता (वय ४८) हे घराजवळील बांधकामाच्या ठिकाणी झाडू मारून स्वच्छता करत होते. यावेळी त्याच परिसरातील रहिवासी ईरफान अमिरुद्दीन सुवर्णदुर्गकर (वय ४३) हा तेथे आला. त्यानंतर त्याने हातातील चाकूसदृश धारदार शस्त्राने वस्ता यांच्यावर हल्ला केल्याची फिर्याद देण्यात आली आहे.
या हल्ल्यात वस्ता यांच्या डाव्या खांद्यावर आणि हनुवटीच्या डाव्या बाजूला वार लागल्याने ते जखमी झाले. घटनेनंतर त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
याप्रकरणी जखमी अब्दुल रशिद मजिद वस्ता यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित ईरफान सुवर्णदुर्गकर याच्याविरुद्ध रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४५७/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हल्ल्यामागील नेमके कारण काय, याचा तपास शहर पोलीस करत आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













