चिपळूण तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा निरबाडे नं. १ येथे कार्यरत असलेल्या उपशिक्षिका अश्विनी माळेकर-पिलके यांची महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्यावतीने प्रदान करण्यात येणाऱ्या ‘आयडॉल शिक्षक पुरस्कार २०२६-२७’ साठी निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीमुळे निरबाडे शाळेसह चिपळूण तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले प्रयत्न, गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी राबवलेले विविध उपक्रम आणि अध्यापनातील योगदानाची दखल घेत अश्विनी माळेकर-पिलके यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, त्यांच्या अंगभूत कलागुणांना वाव मिळावा आणि शिक्षण प्रक्रिया अधिक आनंददायी व प्रभावी व्हावी, यासाठी शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या शिक्षकांच्या कार्याचा गौरव या पुरस्काराच्या माध्यमातून केला जातो. याच पार्श्वभूमीवर अश्विनी माळेकर-पिलके यांची झालेली निवड विशेष महत्त्वाची मानली जात आहे.
निरबाडे नं. १ या शाळेत उपशिक्षिका म्हणून कार्यरत असताना त्यांनी शिक्षण क्षेत्रात दिलेल्या योगदानाची राज्यस्तरावर दखल घेतली जाणे ही शाळेसाठी अभिमानास्पद बाब आहे. त्यांच्या या यशामुळे शाळेच्या नावलौकिकात आणखी भर पडली आहे.
या निवडीबद्दल आमदार शेखर निकम, चिपळूण तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी इरनाक, विस्तार अधिकारी राज अहमद देसाई, चिपळूण नं. २ बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी श्रीधर शिगवण, मोरवणे केंद्राचे केंद्रप्रमुख भगवान मोरे यांच्यासह शैक्षणिक, सामाजिक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













