Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

रत्नागिरी : पोमेंडी बुद्रुक–निवसर रेल्वे मार्गावर अनोळखी तरुणाचा छिन्नविछिन्न मृतदेह

banner 468x60

रत्नागिरी तालुक्यातील पोमेंडी बुद्रुक ते निवसर रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे मार्गावर एका अनोळखी पुरुषाचा छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बीएनएसएस) कलम १९४ अन्वये बेवारस मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (२ ऑगस्ट) सायंकाळी सुमारे ६.५० वाजण्याच्या सुमारास निवसर रेल्वे स्थानकाचे स्टेशन मास्तर यांनी रत्नागिरी रेल्वे स्थानकावर कर्तव्यावर असलेले कर्मचारी राजेंद्र सिंह मनेश्वर चौहान यांना दूरध्वनीद्वारे पोमेंडी बुद्रुक ते निवसर दरम्यान कि.मी. २०८/४-५ येथे एक व्यक्ती मृतावस्थेत पडल्याची माहिती दिली. त्यानंतर ही माहिती रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याला कळविण्यात आली.

घटनास्थळी पोलीस पथक पोहोचले असता अंदाजे ३१ ते ३५ वर्षे वयोगटातील एका अनोळखी पुरुषाचा छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह रेल्वे मार्गावर आढळून आला. मृताची ओळख अद्याप पटलेली नसून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे.

या प्रकरणी २ ऑगस्ट रोजी रात्री ११.१६ वाजता बेवारस मृत्यूची नोंद करण्यात आली असून मृताची ओळख पटविणे तसेच मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी रत्नागिरी ग्रामीण पोलीस अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *