रत्नागिरी : मुरुगवाडा-पांढरा समुद्र परिसरात पोलिसांची कारवाई, ‘मिशन फिनिक्स’अंतर्गत ब्राऊन हेरॉईनसह दुचाकी जप्त; ₹1.50 लाखांचा मुद्देमाल ताब्यात

banner 468x60

रत्नागिरी येथे अंमली पदार्थांच्या तस्करी आणि विक्रीविरोधात रत्नागिरी पोलिसांनी सुरू केलेल्या ‘मिशन फिनिक्स’ अंतर्गत आणखी एक कारवाई करण्यात आली आहे. रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुरुगवाडा-पांढरा समुद्र परिसरात पेट्रोलिंगदरम्यान एका संशयित इसमाकडून विक्रीच्या उद्देशाने बाळगलेला ब्राऊन हेरॉईनसदृश अंमली पदार्थ जप्त करण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी शहर पोलिसांचे गुन्हे प्रकटीकरण पथक मुरुगवाडा-पांढरा समुद्र परिसरात गस्त घालत असताना एका संशयित इसमाची चौकशी करण्यात आली. त्यावेळी त्याच्याकडे अंमली पदार्थ आढळून आला. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संबंधित इसमाच्या ताब्यातील ब्राऊन हेरॉईन आणि दुचाकी वाहन असा एकूण सुमारे ₹१ लाख ५० हजार किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी अरांक्षा यादव (भा.पो.से.) यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. कारवाईत परि. पोलीस उपअधीक्षक अभिजीत थोरात, पोलीस निरीक्षक विवेक पाटील, पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे, सहायक पोलीस फौजदार दीपक साळवी, पोलीस हवालदार शांताराम झोरे, दिनेश आखाडे, भालचंद्र मयेकर तसेच पोलीस कॉन्स्टेबल अमित पालवे आणि निलेश शिंगवे सहभागी होते.

अंमली पदार्थांची विक्री व तस्करी रोखण्यासाठी रत्नागिरी पोलिसांकडून ‘मिशन फिनिक्स’अंतर्गत कारवायांना वेग देण्यात आला असून, या कारवाईमुळे शहरातील अंमली पदार्थांच्या व्यवहारांवर पोलिसांची करडी नजर असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *