Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

रत्नागिरी : परवानगीशिवाय खताचा साठा; कृषी विभागाची धडक कारवाई, दुकान मालकावर गुन्हा

banner 468x60

रत्नागिरी तालुक्यातील खालगाव-जाकादेवी येथे आवश्यक परवानगीविना खतांचा साठा करून विक्रीसाठी ठेवलेल्या खत विक्री केंद्रावर कृषी विभागाने धडक कारवाई केली. या कारवाईत ५८ हजार ९६० रुपये किमतीचा विविध प्रकारच्या खतांचा साठा जप्त करण्यात आला असून, दुकान मालक मिलिंद केशव सावंत (रा. खालगाव-जाकादेवी, ता. रत्नागिरी) यांच्याविरुद्ध रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित खत विक्री केंद्राची तपासणी केली असता, खतांची विक्री व साठवणुकीसाठी आवश्यक असलेला वैध परवाना नसतानाही दुकानात मोठ्या प्रमाणात विविध प्रकारच्या खतांचा साठा आढळून आला. त्यानंतर अधिकाऱ्यांनी पंचनामा करून ५८ हजार ९६० रुपयांचा खतसाठा जप्त केला.

या प्रकरणी राजेंद्र कुंगेर यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, त्यानुसार मिलिंद सावंत यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी पुढील तपास आणि कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे.

प्राथमिक तपासात खत नियंत्रण आदेश तसेच खत विक्री आणि साठवणुकीसंदर्भातील नियमांचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाल्याने ही कारवाई करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली. कृषी विभागाच्या या कारवाईमुळे विनापरवाना खत विक्री आणि साठवणूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *