रत्नागिरी शहरातील कोकणनगर परिसरात प्रतिबंधित पानमसाला आणि तंबाखूची विक्री करण्याच्या उद्देशाने साठवणूक केल्याप्रकरणी एका विक्रेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली.
ही कारवाई २४ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १ वाजता बगदादी चौक, कोकणनगर बस स्टॉपजवळील अब्दल पान शॉप येथे करण्यात आली. अन्न सुरक्षा अधिकारी तृप्ती व्यंकटेश घरत यांनी याबाबत रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अब्दल कादिर (वय ३१) याच्याकडे शासनाने प्रतिबंधित केलेल्या पानमसाला आणि तंबाखूजन्य पदार्थांचा साठा विक्रीच्या उद्देशाने आढळून आला. प्रतिबंधित अन्न पदार्थांच्या सेवनामुळे मानवी आरोग्यावर घातक परिणाम होण्याची शक्यता असतानाही त्यांची साठवणूक व विक्री केल्याचा आरोप आहे.
कारवाईदरम्यान २,९६४ रुपये किमतीचा प्रतिबंधित अन्नसाठा जप्त करण्यात आला. यामध्ये तंबाखू, पानमसाल्याची ३ पाकिटे आणि १५७ पाऊच असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३७०/२०२६ नोंद करण्यात आला असून, भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १२३, २२३, २७४, २७५ तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ मधील संबंधित कलमांनुसार कारवाई करण्यात आली आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













