Breaking News
दापोली : दापोली वक्फ जमीन व्यवहाराला नवे वळण, जमीन व्यवहार प्रकरणी दापोली उपनगराध्यक्ष खालिद रखांगे यांची बाजू समोर, ‘माझे सर्व कागदपत्रे क्लिअर, वक्फ बोर्डाच्या जमिनीचे खरेदीखत होत नाही, मी जागा पाहून घेतली’ – खालिद रखांगे यांची कोकण कट्टा न्यूजला माहिती राजापूर : गवतात पडलेल्या महावितरणच्या विजेच्या तारेला स्पर्श, शेतकऱ्याचा जागीच मृत्यूमहावितरणच्या ढिसाळ कारभाराविरोधात ग्रामस्थ संतप्त रत्नागिरी : भरधाव ॲक्टिव्हाची महिलेला जोरदार धडक, गंभीर जखमी करून चालक पसार गुहागर : ग्रामदेवतेच्या मंदिरातून 32 हजारांचे दोन अॅम्प्लिफायर चोरीला राजापूर : दिवसा घरफोडी, कुलूप तोडून 12 हजारांचे चांदीचे साहित्य लंपास

राजापूर : अवैध गोवा बनावटीच्या दारूवर धाड; 9 लाखांचा मुद्देमाल जप्त

banner 468x60

राजापूर जिल्ह्यात वाढत्या अवैध मद्यविक्री आणि गोवा बनावटीच्या दारूच्या छुप्या वाहतुकीवर आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने विशेष मोहीम सुरू केली असून, त्याअंतर्गत राजापूर तालुक्यात मोठी कारवाई करण्यात आली आहे. साखरतरवाडी येथे उभ्या असलेल्या एका मोटारीवर टाकलेल्या धाडीत तब्बल ९ लाख ८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्य उत्पादन शुल्क विभागाला गोपनीय माहिती मिळाली होती की, साखरतरवाडी परिसरात एका वाहनातून गोवा बनावटीची अवैध दारू साठवून ठेवण्यात आली आहे. या माहितीच्या आधारे निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली विभागाच्या पथकाने शुक्रवारी दुपारी सुमारे २.३० वाजता सापळा रचत कारवाई केली.


तपासणीदरम्यान संबंधित मोटारीतून गोवा बनावटीच्या मद्याचे बॉक्स आढळून आले. पथकाने तत्काळ वाहनाची झडती घेतली असता २ लाख ८ हजार ३२० रुपये किमतीची अवैध दारू जप्त करण्यात आली. याशिवाय दारू वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली अंदाजे ७ लाख रुपये किमतीची मोटारही ताब्यात घेण्यात आली. अशाप्रकारे एकूण ९ लाख ८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी वाहनमालक अक्षय अरविंद खटावकर याच्याविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सुरू आहे.

दरम्यान, महाराष्ट्र दिनी राजापूर येथील परवानाधारक मद्यविक्रेत्यांनी अवैध दारूविक्रीविरोधात उपोषणाचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर अधीक्षक कीर्ती शेडगे यांनी कठोर कारवाईचे आश्वासन दिले होते. त्यानुसार जिल्ह्यात विशेष मोहीम राबवण्यात येत असून, राजापूरमधील ही कारवाई त्याच मोहिमेचा भाग असल्याचे सांगितले जात आहे.

राजापूरप्रमाणेच आता रत्नागिरी शहर व परिसरातील भाटीमिऱ्या, चवडेवठार, तेली आळी, एमआयडीसी, सैतवडे आणि वाटद या भागांमध्येही अवैध दारू विक्रीविरोधात धडक मोहीम सुरू करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या या कारवाईमुळे अवैध मद्यविक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *