Breaking News
खेड : ट्रिपल सीट दुचाकी पुलाच्या कठड्यावर आदळली, 34 वर्षीय तरुणाचा मृत्यू राजापूर : गौरी-गणपती दर्शनासाठी माहेरी गेल्या अन् घर फोडून चोरट्यांनी 67 हजारांचा ऐवज लंपास केला, रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने चोरीला दापोली : कर्दे समुद्रकिनाऱ्यावर स्वच्छता अभियान, ग्रामस्थांसह मुंबईकरांचा उत्स्फूर्त सहभाग, संपूर्ण आठवडा स्वच्छता सप्ताह म्हणून साजरा करण्याचे आवाहन रत्नागिरी : राजीवडा समुद्रात मच्छीमार नौका उलटली, आठ जणांचा थरारक बचाव, ‘अल सुरया’वरील खलाशांच्या धाडसामुळे मोठा अनर्थ टळला रत्नागिरी : मांडवी किनाऱ्यावर ‘कोकण सागर तट स्वच्छता अभियान’, आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता दिनानिमित्त विविध संस्थांचा सहभाग; प्लास्टिक, कचरा गोळा करत सागरी स्वच्छतेचा संदेश

राजापूर : गौरी-गणपती दर्शनासाठी माहेरी गेल्या अन् घर फोडून चोरट्यांनी 67 हजारांचा ऐवज लंपास केला, रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने चोरीला

banner 468x60

गौरी-गणपतीच्या सणानिमित्त माहेरी गेलेल्या महिलेचे बंद घर हेरून अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केल्याची घटना राजापूर तालुक्यातील खरवते वाणीवाडी येथे उघडकीस आली आहे. चोरट्यांनी घरातील कपाट फोडून रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण ६७ हजार ४६८ रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला आपल्या पती आणि मुलीसह १८ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घराला आणि गेटला कुलूप लावून गौरी-गणपती दर्शनासाठी तळवडे येथे माहेरी गेल्या होत्या. घर बंद असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी १८ सप्टेंबरच्या सायंकाळपासून १९ सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकरापर्यंतच्या कालावधीत घरात प्रवेश केला.

चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाजाचा कडी-कोयंडा हत्याराच्या साहाय्याने तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील स्टडी रूम आणि बेडरूममधील कपाटांची झडती घेतली. कपाटात ठेवलेली ३० हजार रुपयांची रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली.

याशिवाय चोरट्यांनी सोन्याचे इअररिंग्स, सोन्याची अंगठी, हिऱ्याची कडी, सोन्याची नथ, सोन्याचे लॉकेट, चांदीचे पैंजण, चांदीची साखळी आणि चांदीचे नाणे असा मौल्यवान ऐवजही चोरून नेला.

घरातील सामानाची तपासणी केल्यानंतर घरफोडी झाल्याचे लक्षात येताच संबंधित महिलेने तत्काळ राजापूर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ मधील कलम ३०५(अ), ३३१(३) आणि ३३१(४) नुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सणासुदीच्या काळात अनेक कुटुंबे गावाबाहेर जात असल्याने बंद घरांना चोरट्यांकडून लक्ष्य केले जाण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर खरवते येथील घरफोडीच्या घटनेमुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरट्यांचा शोध घेण्यासाठी राजापूर पोलीस तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *