खेडमध्ये मधमाशांच्या हल्ल्यात 62 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

banner 468x60

खेड पोयनार येथील गोठणी नदी परिसरात फेरफटका मारण्यासाठी गेलेल्या ६२ वर्षीय व्यक्तीवर मधमाशांनी हल्ला केल्याची दुर्दैवी घटना घडली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

पांडुरंग गणपत डिगे (वय ६२, रा. पोयनार, डिगेवाडी, ता. खेड) हे १८ सप्टेंबर रोजी पोयनार गावातील गोठणी नदीवर फेरफटका मारण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांना मधमाशांनी चावा घेतला. मधमाशांच्या हल्ल्यामुळे त्यांच्या शरीरावर ठिकठिकाणी जखमा झाल्या.

त्यानंतर त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय, दापोली येथे नेण्यात आले. प्राथमिक उपचार केल्यानंतर अधिक उपचारासाठी मुंबई येथे घेऊन जात असताना त्यांची प्रकृती अचानक खालावली आणि त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालय कळंबणी येथे दाखल करण्यात आले.

१९ सप्टेंबर रोजी पहाटे २.३९ वाजता उपजिल्हा रुग्णालय कळंबणी येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता पांडुरंग डिगे यांना मृत घोषित केले. या घटनेची नोंद खेड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक ८०/२०२६, बीएनएसएस कलम १९४ अन्वये करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *