Breaking News
राजापूर : गौरी-गणपती दर्शनासाठी माहेरी गेल्या अन् घर फोडून चोरट्यांनी 67 हजारांचा ऐवज लंपास केला, रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने चोरीला दापोली : कर्दे समुद्रकिनाऱ्यावर स्वच्छता अभियान, ग्रामस्थांसह मुंबईकरांचा उत्स्फूर्त सहभाग, संपूर्ण आठवडा स्वच्छता सप्ताह म्हणून साजरा करण्याचे आवाहन रत्नागिरी : राजीवडा समुद्रात मच्छीमार नौका उलटली, आठ जणांचा थरारक बचाव, ‘अल सुरया’वरील खलाशांच्या धाडसामुळे मोठा अनर्थ टळला रत्नागिरी : मांडवी किनाऱ्यावर ‘कोकण सागर तट स्वच्छता अभियान’, आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता दिनानिमित्त विविध संस्थांचा सहभाग; प्लास्टिक, कचरा गोळा करत सागरी स्वच्छतेचा संदेश रत्नागिरी : लाखो रुपयांचे हेरॉईन जप्त, नेपाळी नागरिकांवर एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा

रत्नागिरी : राजीवडा समुद्रात मच्छीमार नौका उलटली, आठ जणांचा थरारक बचाव, ‘अल सुरया’वरील खलाशांच्या धाडसामुळे मोठा अनर्थ टळला

banner 468x60

मासेमारी आटोपून किनाऱ्याकडे परतणाऱ्या मच्छीमार नौकेला महाकाय लाटेचा तडाखा बसल्याने ती समुद्रात उलटल्याची थरारक घटना रविवारी सकाळी राजीवडा समुद्रात घडली. ‘ओशियन पर्ल’ नावाची मच्छीमार नौका राजीवडा जेटीच्या दिशेने परतत असताना अचानक आलेल्या प्रचंड लाटेने नौकेला जोरदार तडाखा दिला. या तडाख्यामुळे नौकेचा तोल बिघडला आणि काही क्षणांतच नौका समुद्रात उलटली. नौकेवरील सर्व आठ मच्छीमार समुद्राच्या पाण्यात फेकले गेल्याने काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी सुमारे पावणेनऊच्या सुमारास ‘ओशियन पर्ल’ ही नौका मासेमारी आटोपून राजीवडा जेटीकडे परतत होती. किनाऱ्यापासून काही अंतरावर असतानाच समुद्रात अचानक मोठी लाट आली. या लाटेने नौकेवर जोरदार धडक दिल्याने नौकेचा समतोल पूर्णपणे ढासळला. काही कळायच्या आत नौका उलटली आणि त्यावरील मच्छीमार थेट समुद्रात फेकले गेले.

या दुर्घटनेत साद हुसये (२१), मुहाफीस मुकादम (२२), अहमद सोलकर (३८), इम्तियाज मुजावर (२१), नासिर हुसये (६०), शोएब हुसये (३०), इमरान डंगी (३५) आणि तौसीफ सोलकर (३५) हे आठही मच्छीमार समुद्रात पडले. हे सर्वजण राजीवडा परिसरातील रहिवासी आहेत.

नौका उलटल्याने अचानक समुद्राच्या पाण्यात फेकले गेल्याने सर्वजण जीवाच्या आकांताने बचावासाठी प्रयत्न करत होते. समुद्राचा प्रवाह आणि लाटांचा वेग यामुळे परिस्थिती गंभीर बनली होती. अशा वेळी त्यांच्या मागून येत असलेल्या ‘अल सुरया’ या दुसऱ्या मच्छीमार नौकेवरील खलाशांच्या दुर्घटना लक्षात आली.

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येताच ‘अल सुरया’वरील खालिद होडेकर, अजमल हुनेरकर, कैफ होडेकर, खलील मजगावकर आणि यासीन पावसकर यांनी क्षणाचाही विलंब न करता बचावकार्य सुरू केले. समुद्रात बुडत असलेल्या मच्छीमारांपर्यंत पोहोचून त्यांनी एक-एक करून सर्व आठ जणांना बाहेर काढले.

खलाशांनी दाखवलेल्या या प्रसंगावधानामुळे समुद्रात घडू शकणारा मोठा अनर्थ टळला. आठही मच्छीमारांचा सुखरूप बचाव करण्यात आला असून त्यांना सुरक्षितपणे किनाऱ्यावर आणण्यात आले.

मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांसाठी समुद्रातील अचानक बदलणाऱ्या परिस्थितीचे गांभीर्य या घटनेतून पुन्हा एकदा समोर आले आहे. मात्र, दुर्घटना घडताच मदतीला धावून गेलेल्या ‘अल सुरया’वरील खलाशांच्या धाडसामुळे आठ कुटुंबांवर ओढवू शकणारे मोठे संकट टळले. त्यांच्या धाडसाचे, तत्परतेचे आणि माणुसकीचे राजीवडा परिसरातून कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *