Breaking News
रत्नागिरी : भाटये येथे अंमली पदार्थ सेवन करताना तरुणाला ताब्यात , सिगारेटचे अर्धवट थोटूक व लायटर जप्त खेड : ट्रिपल सीट दुचाकी पुलाच्या कठड्यावर आदळली, 34 वर्षीय तरुणाचा मृत्यू राजापूर : गौरी-गणपती दर्शनासाठी माहेरी गेल्या अन् घर फोडून चोरट्यांनी 67 हजारांचा ऐवज लंपास केला, रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने चोरीला दापोली : कर्दे समुद्रकिनाऱ्यावर स्वच्छता अभियान, ग्रामस्थांसह मुंबईकरांचा उत्स्फूर्त सहभाग, संपूर्ण आठवडा स्वच्छता सप्ताह म्हणून साजरा करण्याचे आवाहन रत्नागिरी : राजीवडा समुद्रात मच्छीमार नौका उलटली, आठ जणांचा थरारक बचाव, ‘अल सुरया’वरील खलाशांच्या धाडसामुळे मोठा अनर्थ टळला

खेड : ट्रिपल सीट दुचाकी पुलाच्या कठड्यावर आदळली, 34 वर्षीय तरुणाचा मृत्यू

banner 468x60

खेड आंबडस येथून चायनिज खाऊन भेलसईकडे परतत असताना ट्रिपल सीट दुचाकी पुलाच्या कठड्यावर आदळून झालेल्या अपघातात ३४ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. या अपघातात अन्य दोघे जखमी झाले. ही घटना १२ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे १०.४५ वाजता भेलसई चौथाई येथील भेलसई पुलावर घडली.

मयताचे नाव रुपेश सुरेश धाडवे (वय ३४, रा. भेलसई गंग धाडवेवाडी, ता. खेड) असे आहे. तर सर्वेश शिवाजी धाडवे आणि दर्शन अनंत धाडवे (वय २१) हे जखमी झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुपेश धाडवे, सर्वेश धाडवे आणि दर्शन धाडवे हे तिघेही यामाहा मोटारसायकल क्रमांक एमएच ४३ सीएफ २१७७ वरून आंबडस येथून भेलसईच्या दिशेने येत होते. भेलसई पुलाजवळील वळण आणि उताराच्या ठिकाणी दुचाकीवरील नियंत्रण सुटले. दुचाकी पुलाच्या सिमेंटच्या कठड्यावर जोरात आदळली.

या अपघातात रुपेश यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. सर्वेश यांच्या उजव्या डोळ्याजवळ दुखापत झाली, तर दर्शन यांच्या उजव्या हाताच्या करंगळीजवळील बोटाला दुखापत झाली. दुचाकीच्या पुढील भागाचे तसेच हेडलाईटचे नुकसान झाले.

या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३१६/२०२६ नुसार भारतीय न्यायसंहिता कलम १०६(१), २८१, १२५(अ)(ब) तसेच मोटार वाहन कायद्यातील कलम १८४, १२८/१७७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातानंतर दर्शन हे मुंबई येथे गेले होते. ते १९ सप्टेंबर रोजी खेड पोलीस ठाण्यात हजर झाल्यानंतर त्यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *