रत्नागिरी : राजापूर नगरपरिषदेतील काँग्रेसच्या नगरसेविका अफरोज झारी यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात आले आहे. जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राजापूरच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून महाविकास आघाडीला मोठा धक्का मानला जात आहे.
डिसेंबर २०२५ मध्ये झालेल्या राजापूर नगरपरिषदेच्या निवडणुकीत अफरोज झारी या काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आल्या होत्या. त्यांनी निवडणुकीसाठी सादर केलेले जात प्रमाणपत्र जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने अवैध ठरवले होते. त्यानंतर या प्रकरणाची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्याचा निर्णय घेतला.
राजापूर नगरपरिषदेतील सत्तेचे गणित यामुळे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या नगरपरिषदेत महाविकास आघाडीची सत्ता असून महायुतीकडेही दहा नगरसेवकांचे संख्याबळ असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे एका जागेच्या रिक्ततेमुळे पुढील राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे.
अफरोज झारी यांचे पद रद्द झाल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. निवडणूक प्रक्रिया, पुढील प्रशासकीय निर्णय आणि राजापूर नगरपरिषदेतील बदलते राजकीय समीकरण याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













