Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

दापोली : ‘महाविस्तार एआय’ ॲपद्वारे स्मार्ट शेतीकडे वाटचाल, शिवाजीनगर-साखळोली येथे जनजागृती व नोंदणी कार्यक्रम उत्साहात

banner 468x60

प्रतिनिधी (सागर गोवळे) आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांना शेतीविषयक माहिती एका क्लिकवर उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने संजीवनी गटाच्या वतीने शिवाजीनगर, साखळोली येथे ‘महाविस्तार एआय’ (Mahavistar AI) ॲपविषयी जनजागृती व नोंदणी कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात परिसरातील शेतकरी व विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत आधुनिक डिजिटल शेतीची माहिती जाणून घेतली.

कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित शेतकरी व मान्यवरांच्या स्वागताने झाली. त्यानंतर ‘महाविस्तार एआय’ या ॲपची सविस्तर माहिती देण्यात आली. स्मार्ट शेती आणि प्रिसिजन ॲग्रिकल्चरला चालना देणारे हे ॲप शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

यावेळी ॲपमधील विविध सुविधांची माहितीही देण्यात आली. यामध्ये हवामानाचा अचूक अंदाज, डिजिटल शेतीविषयक मार्गदर्शन, तालुका कृषी अधिकाऱ्यांमार्फत शेती शाळा, गोदामे व साठवणूक सुविधांची माहिती, शेती अवजारांची उपलब्धता, खत गणक (Fertilizer Calculator) तसेच नफा गणक (Profit Calculator) यांसारख्या सुविधांचा समावेश असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

या कार्यक्रमात परिसरातील १९ शेतकरी आणि १० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विशेष म्हणजे, उपस्थितांपैकी १६ शेतकऱ्यांच्या मोबाईलमध्ये प्रत्यक्ष ‘महाविस्तार एआय’ ॲप डाऊनलोड करून त्यांची यशस्वी नोंदणी करण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांना या ॲपचा प्रत्यक्ष वापर कसा करायचा, याचे मार्गदर्शनही करण्यात आले.

कार्यक्रमाच्या शेवटी शेतकऱ्यांनी या उपक्रमाचे स्वागत करत, आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतीविषयक महत्त्वाची माहिती घरबसल्या सहज उपलब्ध होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. अशा प्रकारचे मार्गदर्शक कार्यक्रम ग्रामीण भागात सातत्याने आयोजित करण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

हा कार्यक्रम विद्यापीठ व महाविद्यालयीन अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडला. यासाठी डॉ. रमेश कुणकेरकर (सहयोगी अधिष्ठाता), डॉ. अशोक चव्हाण (रावे कार्यक्रम समन्वयक), डॉ. विजय देसाई (रावे केंद्र प्रमुख), डॉ. तोरणे (विषय विशेषज्ञ), डॉ. आशिष शिगवण (कार्यक्रम अधिकारी) आणि डॉ. प्रवीण झगडे (कार्यक्रम अधिकारी) यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *