Breaking News
दापोली : दापोली वक्फ जमीन व्यवहाराला नवे वळण, जमीन व्यवहार प्रकरणी दापोली उपनगराध्यक्ष खालिद रखांगे यांची बाजू समोर, ‘माझे सर्व कागदपत्रे क्लिअर, वक्फ बोर्डाच्या जमिनीचे खरेदीखत होत नाही, मी जागा पाहून घेतली’ – खालिद रखांगे यांची कोकण कट्टा न्यूजला माहिती राजापूर : गवतात पडलेल्या महावितरणच्या विजेच्या तारेला स्पर्श, शेतकऱ्याचा जागीच मृत्यूमहावितरणच्या ढिसाळ कारभाराविरोधात ग्रामस्थ संतप्त रत्नागिरी : भरधाव ॲक्टिव्हाची महिलेला जोरदार धडक, गंभीर जखमी करून चालक पसार गुहागर : ग्रामदेवतेच्या मंदिरातून 32 हजारांचे दोन अॅम्प्लिफायर चोरीला राजापूर : दिवसा घरफोडी, कुलूप तोडून 12 हजारांचे चांदीचे साहित्य लंपास

दाभोळ : कोळथरे येथे मृदा नमुना संकलन व परीक्षण विषयक प्रात्यक्षिक, शेतकऱ्यांना शास्त्रीय शेतीचे मार्गदर्शन

banner 468x60

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ संलग्न उद्यानविद्या महाविद्यालय, दापोली यांच्या ग्रामीण उद्यान कार्यानुभव (RHWE) कार्यक्रमांतर्गत कोळथरे गावात मृदा नमुना संकलन व मृदा परीक्षण या विषयावरील प्रात्यक्षिक कार्यक्रम उत्साहात पार पडला.

यावेळी शेतकऱ्यांना शेतातील मातीचा नमुना शास्त्रोक्त पद्धतीने कसा घ्यावा, नमुना संकलन करताना कोणती काळजी घ्यावी तसेच मृदा परीक्षणाचे शेती व्यवस्थापनातील महत्त्व याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. मृदा परीक्षणाच्या माध्यमातून जमिनीतील अन्नद्रव्यांची उपलब्धता, सामू (pH), सेंद्रिय कर्ब आणि इतर घटकांचे प्रमाण निश्चित करता येते. या माहितीच्या आधारे पिकांसाठी संतुलित खत व्यवस्थापन करणे शक्य होत असून उत्पादनवाढीसह शेतीचा खर्च कमी करण्यास मदत होते, असे तज्ज्ञांनी स्पष्ट केले.

उद्यानविद्या महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे मृदा नमुना संकलनाची योग्य पद्धत शेतकऱ्यांना समजावून सांगितली. तसेच जमिनीचे आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी नियमित मृदा परीक्षण करण्याचे आवाहन करण्यात आले.

कार्यक्रमास कोळथरे गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी कार्यक्रमाबाबत समाधान व्यक्त करत शास्त्रीय पद्धतीने मृदा परीक्षण करून आधुनिक शेती पद्धतींचा अवलंब करण्याचा निर्धार व्यक्त केला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी RHWE कार्यक्रमातील विद्यार्थिनींनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *