Breaking News
दापोली : दापोली वक्फ जमीन व्यवहाराला नवे वळण, जमीन व्यवहार प्रकरणी दापोली उपनगराध्यक्ष खालिद रखांगे यांची बाजू समोर, ‘माझे सर्व कागदपत्रे क्लिअर, वक्फ बोर्डाच्या जमिनीचे खरेदीखत होत नाही, मी जागा पाहून घेतली’ – खालिद रखांगे यांची कोकण कट्टा न्यूजला माहिती राजापूर : गवतात पडलेल्या महावितरणच्या विजेच्या तारेला स्पर्श, शेतकऱ्याचा जागीच मृत्यूमहावितरणच्या ढिसाळ कारभाराविरोधात ग्रामस्थ संतप्त रत्नागिरी : भरधाव ॲक्टिव्हाची महिलेला जोरदार धडक, गंभीर जखमी करून चालक पसार गुहागर : ग्रामदेवतेच्या मंदिरातून 32 हजारांचे दोन अॅम्प्लिफायर चोरीला राजापूर : दिवसा घरफोडी, कुलूप तोडून 12 हजारांचे चांदीचे साहित्य लंपास

दापोली : ‘एक राखी जवानांसाठी’ उपक्रम, विद्यार्थ्यांसाठी दोन तालुकास्तरीय स्पर्धांचे आयोजन

banner 468x60

दापोली तालुक्यात कै. कृष्णामामा महाजन स्मृतिप्रतिष्ठानच्या युवा प्रेरणा कट्टाच्या वतीने यंदाही रक्षाबंधनानिमित्त ‘एक राखी जवानांसाठी’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या काही वर्षांपासून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमातून शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी तयार केलेल्या राख्या देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावणाऱ्या जवानांना पाठवून त्यांच्याप्रती आदर, कृतज्ञता आणि सद्भावना व्यक्त केली जाते.

यंदाच्या उपक्रमात आणखी एक नवीन उपक्रम जोडण्यात आला असून, विद्यार्थ्यांसाठी दोन तालुकास्तरीय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये इयत्ता ५वी ते ७वीसाठी ‘हस्तनिर्मित राखी स्पर्धा’, तर इयत्ता ८वी ते १२वीसाठी ‘सैनिकांप्रति आदर व्यक्त करणारी कविता/पत्र लेखन स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांना आणि देशाच्या जवानांप्रती असलेल्या भावना या माध्यमातून व्यक्त कराव्यात, हा या स्पर्धांमागील उद्देश आहे. दापोली तालुक्यातील अधिकाधिक शाळांमधील विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

या उपक्रमासाठी राख्या, पत्रे आणि कविता दि. १८ ऑगस्ट २०२६ पर्यंत जमा करता येणार आहेत. त्यासाठी केळस्कर नाका येथील हसमुख एंटरप्रायझेस येथे संकलनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

देशाच्या सीमेवर प्रतिकूल परिस्थितीत सेवा बजावणाऱ्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासोबतच विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रभावना रुजविणाऱ्या या उपक्रमाला दापोली तालुक्यातील विद्यार्थी, पालक आणि शाळांनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असे आवाहन कै. कृष्णामामा महाजन स्मृतिप्रतिष्ठान-युवा प्रेरणा कट्टाच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *