खेड : आंबवली येथे वृध्दाची गळफास लावून आत्महत्या

banner 468x60

खेड तालुक्यातील आंबवली भिंगारवाडी येथे एका ५६ वर्षीय व्यक्तीने राहत्या घराशेजारील गोठ्यात गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

banner 728x90


​मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मण गंगाराम केंडे (वय ५६), रा. आंबवली, भिंगारवाडी (ता. खेड) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. बुधवार, दिनांक ८ एप्रिल रोजी सकाळी ६ ते ८ वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. केंडे यांनी आपल्या गुरांच्या गोठ्यातील पोटमांड्याच्या लाकडी वाशाला नायलॉनच्या दोरीने गळफास लावून आपले जीवन संपवले.


​या घटनेची माहिती मृताचे चुलत भाऊ धोंडीराम नामदेव केंडे यांनी पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार पोलिसांनी बी.एन.एस.एस. कलम १९४ अन्वये अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. ​आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून, खेड पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *