Breaking News
रत्नागिरी : सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची चौथ्या मजल्यावरून उडी, पतीसह सासरच्या पाच जणांवर गुन्हा, ‘माहेरून फ्लॅट घेण्यासाठी पैसे आणावेत, अन्यथा मुलाचा दुसरा विवाह करून देऊ’, मुलांपासून दूर ठेवल्याचा तक्रारीत आरोप पाच सागरी जिल्ह्यांतील भूमिपुत्रांची एकजूट, ‘सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना रत्नागिरी : ज्येष्ठ पत्रकार जावेद मुजावर यांचे निधन,पत्रकारिता, सहकार क्षेत्रात हळहळ धक्कादायक खेडमध्ये दोन तरुण बेपत्ता, अपहरणाचा संशय, अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हे दाखल दाभोळ : आघारीत 54 वर्षीय व्यक्तीचा संशयास्पद अवस्थेत मृत्यू, भुंडावड परिसरात आढळले होते बेशुद्ध

मंडणगड : बुलेरो पिकअपची दुचाकीला जोरदार धडक, महिलेचा जागीच मृत्यू

banner 468x60

तालुक्यातील पाट ते शिरगावदरम्यानच्या अंतर्गत रस्त्यावर बुलेरो पिकअपने दिलेल्या जोरदार धडकेत ६५ वर्षीय महिला जागीच ठार झाली असून, पती जखमी झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी (२१ जून) सायंकाळी शिरगाव स्टॉप परिसरात घडली. या प्रकरणी मंडणगड पोलिसांनी बुलेरो चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

या अपघातात मयत झालेल्या महिलाचे नाव जयश्री तुकाराम खेडेकर (वय ६५, रा. कोंडमालुसरे, ता. महाड, जि. रायगड) असे आहे. त्यांचे पती तुकाराम सिताराम खेडेकर (वय ६९) हे जखमी झाले असून, त्यांनीच या घटनेची फिर्याद दिली आहे.

खेडेकर दाम्पत्य हे पाट (ता. मंडणगड) येथे नातेवाईकाच्या धार्मिक विधीसाठी आले होते. विधी कार्य आटपून ते दुचाकी (क्र. MH 04 JT 0058)वरून शिरगावकडे जात होते.

सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास शिरगाव स्टॉपजवळ आले असता, मंडणगडहून म्हाप्रळकडे जाणाऱ्या बुलेरो पिकअप (क्र. MH 07 AJ 3417) ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात जयश्री खेडेकर यांचा जागीच मृत्यू झाला, तर तुकाराम खेडेकर यांना किरकोळ व मध्यम स्वरूपाच्या दुखापती झाल्या. पिकअपचा

चालक सौरभ संदीप चौगुले (वय १८, रा. मालवण, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग) याच्याविरोधात मंडणगड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी गुन्हा रजिस्टर नंबर २६/२०२५ नुसार भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम १०६, २८१, १२५ (अ), १२५ (ब) व मोटार वाहन कायदा कलम १३२/१७७, १३४(ब), १७७, १८४ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या अपघात प्रकरणी पोलिस तपास सुरू असून, या अपघाताने खेडेकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे


सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास शिरगाव स्टॉपजवळ आले असता, मंडणगडहून म्हाप्रळकडे जाणाऱ्या बुलेरो पिकअप (क्र. MH 07 AJ 3417) ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात जयश्री खेडेकर यांचा जागीच मृत्यू झाला, तर तुकाराम खेडेकर यांना किरकोळ व मध्यम स्वरूपाच्या दुखापती झाल्या. पिकअपचा चालक सौरभ संदीप चौगुले (वय १८, रा. मालवण, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग) याच्याविरोधात मंडणगड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी गुन्हा रजिस्टर नंबर २६/२०२५ नुसार भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम १०६, २८१, १२५ (अ), १२५ (ब) व मोटार वाहन कायदा कलम १३२/१७७, १३४(ब), १७७, १८४ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या अपघात प्रकरणी पोलिस तपास सुरू असून, या अपघाताने खेडेकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *