लांजा : देवधे येथे ट्रक मोटारसायकलचा भीषण अपघात, दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू

Screenshot

banner 468x60

मुंबई-गोवा महामार्गावर लांजा तालुक्यातील देवधे फाटा येथे आज सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास एका भीषण अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. रवींद्र रघुनाथ सुपल (सध्या रा. लांजा, मूळ सुपलवाडी, नाचणे, रत्नागिरी) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे.

या अपघातामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ट्रक चालक (एम एच 09 ई व्ही 7896) सापुचेतळेहून कराडकडे जात होता. त्याचवेळी रवींद्र सुपल आपल्या दुचाकी (एम एच 08 एस 9755) हा रत्नागिरीहून लांजाच्या दिशेने सेंट्रिंगच्या कामासाठी जात होता. देवधे फाट्याजवळ त्यांच्या दुचाकीला समोरून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. या धडकेत रवींद्र सुपल ट्रकच्या मागच्या चाकाखाली सापडले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.


अपघाताच्या ठिकाणी रक्ताचा सडा पडला होता. घटनेची माहिती मिळताच लांजा पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून, पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.

पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे की नाही, याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही. या दुर्घटनेमुळे सुपल यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *