Breaking News
दापोली : दापोलीत मोठा जमीन घोटाळा? वक्फ जमिनींच्या व्यवहारांना वक्फ मंडळाची नोटीस, जमिनींच्या व्यवहारांचा पर्दाफाश होणार? एका सत्ताधारी पक्षाच्या नेत्याच्या कनेक्शनमुळे प्रकरण चर्चेत, 44 जणांना नोटीस, 7 दिवसांत खुलासा करण्याचे निर्देश रत्नागिरी : सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची चौथ्या मजल्यावरून उडी, पतीसह सासरच्या पाच जणांवर गुन्हा, ‘माहेरून फ्लॅट घेण्यासाठी पैसे आणावेत, अन्यथा मुलाचा दुसरा विवाह करून देऊ’, मुलांपासून दूर ठेवल्याचा तक्रारीत आरोप पाच सागरी जिल्ह्यांतील भूमिपुत्रांची एकजूट, ‘सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना रत्नागिरी : ज्येष्ठ पत्रकार जावेद मुजावर यांचे निधन,पत्रकारिता, सहकार क्षेत्रात हळहळ धक्कादायक खेडमध्ये दोन तरुण बेपत्ता, अपहरणाचा संशय, अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हे दाखल

लांजा : 28 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या, कणगवली शिंदेवाडीतील घटना

banner 468x60

लांजा तालुक्यातील कणगवली शिंदेवाडी येथे गुरुवारी (७ ऑगस्ट) दुपारी सुमारे २.३० च्या सुमारास २८ वर्षीय तरुणाने गुरांच्या गोठ्यात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. प्रथमेश पर्शुराम मांडवकर (वय २८) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. तरुणाच्या आत्महत्येचे लांजा तालुक्यात खळबळ उडाली आहे.


याबाबतची माहिती मृताचा भाऊ पंकज पर्शुराम मांडवकर (वय ३१) याने लांजा पोलिस ठाण्यात दिली. प्रथमेशने घराजवळील गुरांच्या गोठ्यात लाकडी वाशाला दोरी बांधून गळफास घेतला. या वेळी त्याचे वडील बाजारासाठी लांजा येथे गेले होते, आई घरीच होती, तर भाऊ पंकज मजुरीसाठी येरवंडे येथे गेला होता.


प्रथमेश मांडवकर हा गवंडी काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. तो शांत व संयमी स्वभावाचा असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे. मात्र, त्याने टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.


या घटनेचा अधिक तपास लांजा पोलिस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस हेड कॉन्स्टेबल उर्मिला शेडे करत आहेत. प्रथमेशच्या आकस्मिक मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *