Breaking News
रत्नागिरी : पालीत भरधाव मोटारीची दुचाकीला मागून धडक, पतीचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी देवगड : समुद्रात अवैध पर्ससीन मासेमारीवर मत्स्य विभागाचा दणका, एक नौका जप्त दापोली : अवर्षणामुळे खरीप पिके वाया; दापोलीत भारतीय किसान संघ आक्रमक, हेक्टरी 50 हजारांची मदत, रब्बीसाठी मोफत बियाणे-खतांची मागणी दापोली : दापोली वक्फ जमीन व्यवहाराला नवे वळण, जमीन व्यवहार प्रकरणी दापोली उपनगराध्यक्ष खालिद रखांगे यांची बाजू समोर, ‘माझे सर्व कागदपत्रे क्लिअर, वक्फ बोर्डाच्या जमिनीचे खरेदीखत होत नाही, मी जागा पाहून घेतली’ – खालिद रखांगे यांची कोकण कट्टा न्यूजला माहिती राजापूर : गवतात पडलेल्या महावितरणच्या विजेच्या तारेला स्पर्श, शेतकऱ्याचा जागीच मृत्यूमहावितरणच्या ढिसाळ कारभाराविरोधात ग्रामस्थ संतप्त

रत्नागिरी : पाली येथे जुगार अड्ड्यावर धाड

banner 468x60

तालुक्यातील पाली येथील जुगार अड्ड्यावर ग्रामीण पोलिसांनी धाड टाकली. ही कारवाई गुरुवारी (२३ नोव्हेंबर) सायंकाळी ५ वा. सुमारास करण्यात आली आहे.

राजेश सोनू कांबळे (रा. खानू बौद्धवाडी, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल केलेल्या संशयिताचे नाव आहे. ग्रामीण पोलिसांना पाली येथे बेकायदेशीर जुगार अड्डा चालवण्यात येत असल्याची माहिती मिळाली होती.

त्या आधारे पोलिसांनी त्याठिकाणी धाड टाकून काही रोख रक्कम आणि जुगारचे साहित्य जप्त केले. संशयिताविरोधात महाराष्ट्र जुगार प्रतिबंध १८८७ चे कलम १२ अ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *