Breaking News
दापोली : दापोली वक्फ जमीन व्यवहाराला नवे वळण, जमीन व्यवहार प्रकरणी दापोली उपनगराध्यक्ष खालिद रखांगे यांची बाजू समोर, ‘माझे सर्व कागदपत्रे क्लिअर, वक्फ बोर्डाच्या जमिनीचे खरेदीखत होत नाही, मी जागा पाहून घेतली’ – खालिद रखांगे यांची कोकण कट्टा न्यूजला माहिती राजापूर : गवतात पडलेल्या महावितरणच्या विजेच्या तारेला स्पर्श, शेतकऱ्याचा जागीच मृत्यूमहावितरणच्या ढिसाळ कारभाराविरोधात ग्रामस्थ संतप्त रत्नागिरी : भरधाव ॲक्टिव्हाची महिलेला जोरदार धडक, गंभीर जखमी करून चालक पसार गुहागर : ग्रामदेवतेच्या मंदिरातून 32 हजारांचे दोन अॅम्प्लिफायर चोरीला राजापूर : दिवसा घरफोडी, कुलूप तोडून 12 हजारांचे चांदीचे साहित्य लंपास

रत्नागिरी : मुंबई – गोवा महामार्गावर भीषण अपघात, ट्रेलरने 2 पादचारी महिलांना चिरडलं

banner 468x60

गोव्याहून पुण्याकडे निघालेल्या खाजगी ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात झाला. कोल्हापुरातील पुईखडी येथे हा अपघात झाला आहे. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला.

या अपघाता काही तास उलटत नाही तोवर, मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. या महामार्गावर अपघातांचे सत्र सुरुच आहे.

भरधाव येणाऱ्या अवजड वाहनांमुळे हे अपघात अलीकडे घडू लागले आहेत. असाच एक भीषण अपघात आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास लांजा तालुक्यात आंजणारी येथे झाला आहे.भरधाव ट्रेलरने दोन पादचारी महिलांना धडक दिल्याने त्या गंभीर जखमी झाल्या आहेत.

तर यातील एका ३५ वर्षे महिलेचा या अपघातात दुर्दैवीरित्या मृत्यू झाला आहे. पल्लवी प्रकाश पेंढारी (वय ३५, रा. अंजनारी पेंढारी वाडी, ता. लांजा) असं मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे. सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग लांजाजवळ आंजणारी घाट येथे हा मोठा अपघात झाला आहे.

या अपघातत ट्रेलर गाडी नंबर एचआर ३८ व्ही ९७९४ वरील चालक सद्दाम हकिमुदिम अन्सारी (वय २६, रा. बिहार जि. कैमुर) या वाहनाने मुंबईकडून गोवाकडे जात असताना दोन पादचारी महिला यांना धडक दिली.

या अपघातामध्ये पल्लवी प्रकाश पेंढारी यांचा जागीच मृत्यू झाला तर जयश्री धोंडीराम पेंढारी (वय ५२) या गंभीर जखमी झालेल्या आहेत.गंभीर जखमी झालेल्या महिलेला उपचाराकरता खासगी वाहनाने प्राथमिक आरोग्य केंद्र लांजा येथे पाठविण्यात आलेलं आहे.

घटनास्थळी लांजा पोलिसांनी धाव घेऊन महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली व जखमींना स्थानिकांच्या सहकार्याने मदत केली. या अपघात प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची कारवाही सुरु आहे. लांजा पोलीस ठाण्यात या अपघात प्रकरणाची कारवाही सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *