Breaking News
दाभोळ : महाडिक स्टॉप ते कोळथरे रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात, “कोकण कट्टा न्यूजच्या” वृत्ताची दखल चिपळूण : गडनदी-जामदा प्रकल्पातील देयक प्रकरणी कार्यकारी अभियंता प्रकाश जाधव निलंबित मंडणगड : रिक्षा-रुग्णवाहिका मिळेना मध्यरात्री महिलेची प्रकृती गंभीर, ‘112’ नंबरच्या कॉलवर मंडणगड पोलिसांची धावपोलिसांची तत्परता महिलेला ठरली जीवनदायी संगमेश्वर : तीन आमरण उपोषणे, 69 वर्षीय वृद्धाची आत्मदहनाच्या इशाऱ्याची पुनरावृत्ती; तरीही कुळाच्या जमिनीचा न्याय कागदावरच, देवरुख तहसीलदारांच्या आदेशाची अंमलबजावणी रखडली, निर्णय न झाल्यास उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दापोली : मद्यधुंद अवस्थेत ईको कार चालवणाऱ्या चालकावर गुन्हा

रत्नागिरी : दोन गटात जोरदार राडा; परिसरात दहशत

banner 468x60

शहरातील संसारे उद्यान येथील नाना नानी पार्क येथे काल रात्री ९ च्या सुमारास दोन गटात जोरादार राडा झाला. सायंकाळी सुमारे ७ वाजल्यापासून रात्री १० वाजेपर्यंत हा राडा सुरु होता.

या परिसरात अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांचा अड्डा झाला आहे. वारंवार असे राडे होत असतात असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.या राड्यांमुळे परिसरात कायमच दहशतीचे वातावरण असते.

banner 728x90

यापूर्वी अनेकवेळा याबाबत पोलिसांना येथील नागरिकांना कळविले आहे. मात्र अजूनही या गैर प्रकारांना आळा घालण्यात पोलिसांना यश आल्याचे दिसत नाही. काल झालेल्या मोठ्या राड्याने पुन्हा एकदा हा प्रश्न ऐरणीवर आलाय.

येथे येऊन अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या टोळक्यावर पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी आता नागरिकांमधून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *