Breaking News
चिपळूण : प्रशांत यादव यांच्या ‘स्वामिनी’ निवासस्थानी भाजपचा दिवाळी स्नेहमेळावा, पदाधिकारी, कार्यकर्त्यांची मोठी उपस्थितीखेर्डी येथे दिवाळी फराळाचे आयोजन, स्नेहबंध दृढ करत अनौपचारिक संवादातून साधला संवाद मंडणगड : केळवत घाटात दुचाकी आणि मारुती ब्रेझा कारची धडक, तिघे जखमी खेड : 26 वर्षीय तरुणाचा दुचाकी अपघातात मृत्यू, भेलसई खांबेवाडी येथील वळणावर घडली दुर्घटना, मित्राला पाठीमागे घेऊन जाताना मोटारसायकलचा अपघात रत्नागिरी : आंबा घाटात एसटी बसची उभ्या आयशर टेम्पोला जोराची धडक, 9 प्रवासी जखमी चिपळूण : झाडावरून पडून जखमी झालेल्या चिपळुणातील 60 वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू

रत्नागिरी : पॅरोलवर बाहेर आलेला मोईन काझी फरार

banner 468x60

रत्नागिरीतील एका खुनाच्या गुन्ह्यात कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेला कैदी संचित (पॅरोल) रजेवर बाहेर आला होता.

🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या 

पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा 

https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi

👉🏻 आपल्याला जाहिरात आणि बातम्या द्यायच्या असतील तर  संपर्क करा 9960151909

आपली रजेची मुदत संपल्यावरही कारागृहात हजर राहिला नसल्याने या कैद्याविरोधात रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तो जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. मुईन मोहम्मद युसुफ काझी ऊर्फ मोईन उर्फ रॉनी ब्रिगेन्झा ऊर्फ हेमंत शहा (रा. आशियाना मंजिल, आशीर्वाद सोसायटी, उत्कर्षनगर, कुवारबाव, रत्नागिरी) असे त्याचे नाव आहे.

या संशयित आरोपीवर ग्रामीण पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल आहे. त्याला या गुन्ह्यात न्यायालयाने २०१५ ला जन्मठेप आणि १२ हजार दंड, तो न भरल्यास १४ महिने करावासाची शिक्षा सुनावली होती. ही शिक्षा भोगण्यासाठी त्याची रवानगी कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली होती.

दरम्यान, पश्चिम विभाग येरवडा, पुणेचे कारागृह उपमहानिरीक्षकांच्या आदेशानुसार या आरोपीला ८ जुलै ते ४ ऑगस्ट २०२३ या २८ दिवसांच्या संचित रजेवर सोडण्यात आले होते; परंतु रजेचा कालावधी संपल्यावर तो ५ ऑगस्टला कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात हजर होणे अपेक्षित होते;

परंतु तो हजर झालेला नाही. त्यामुळे अनधिकृतपणे कारागृहाबाहेर वास्तव्य करत असल्यामुळे त्याच्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *