खेड तालुक्यातील भेलसई खांबेवाडी येथील वळणावर दुचाकीचा अपघात होऊन २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना ११ नोव्हेंबर रोजी सकाळी घडली. रविंद्र भागुराम तांबे (वय २६, रा. भेलसई बौद्धवाडी, ता. खेड, जि. रत्नागिरी) असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविंद्र तांबे यांच्या ताब्यातील होंडा शाईन मोटारसायकल (क्रमांक एमएच ०८ एडब्ल्यू ६५६१) घेऊन ते गावातील हर्षद तांबे यांना पाठीमागे बसवून भेलसई येथून खेर्डीच्या दिशेने जात होते. दरम्यान, भेलसई खांबेवाडी येथील वळणावर त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला.
या अपघातात रविंद्र तांबे गंभीर जखमी झाले.
त्यांना तातडीने उपचारासाठी चिपळूण येथील लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.
वळणावर झालेल्या या दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू झाल्याने भेलसई परिसरात शोककळा पसरली आहे. या घटनेची पुढील कार्यवाही पोलीस करीत आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













