चिपळूण तालुक्यातील पिंपळी बुद्रुक येथील तांबटवाडीमध्ये झाडावरून पडून गंभीर जखमी झालेल्या ६० वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. सुरेश सखाराम तांबट (वय ६०, रा. पिंपळी बुद्रुक, तांबटवाडी, ता. चिपळूण) असे मृत व्यक्तीचे नाव आहे .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेश तांबट हे १९ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास आपल्या राहत्या घराजवळील झाडावरून पडून जखमी झाले होते. या घटनेनंतर त्यांना तातडीने १०८ रुग्णवाहिकेद्वारे उपचारासाठी कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.
झाडावरून पडल्याने झालेल्या दुखापतीनंतर उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याने पिंपळी बुद्रुक परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













