Breaking News
चिपळूण : प्रशांत यादव यांच्या ‘स्वामिनी’ निवासस्थानी भाजपचा दिवाळी स्नेहमेळावा, पदाधिकारी, कार्यकर्त्यांची मोठी उपस्थितीखेर्डी येथे दिवाळी फराळाचे आयोजन, स्नेहबंध दृढ करत अनौपचारिक संवादातून साधला संवाद मंडणगड : केळवत घाटात दुचाकी आणि मारुती ब्रेझा कारची धडक, तिघे जखमी खेड : 26 वर्षीय तरुणाचा दुचाकी अपघातात मृत्यू, भेलसई खांबेवाडी येथील वळणावर घडली दुर्घटना, मित्राला पाठीमागे घेऊन जाताना मोटारसायकलचा अपघात रत्नागिरी : आंबा घाटात एसटी बसची उभ्या आयशर टेम्पोला जोराची धडक, 9 प्रवासी जखमी चिपळूण : झाडावरून पडून जखमी झालेल्या चिपळुणातील 60 वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू

मंडणगड : केळवत घाटात दुचाकी आणि मारुती ब्रेझा कारची धडक, तिघे जखमी

banner 468x60

मंडणगड तालुक्यातील केळवत घाटाच्या उतारावरील वळणावर दुचाकी आणि मारुती ब्रेझा कार यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात तिघेजण जखमी झाले. ही घटना ७ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात दुचाकीवरील राज नबीसाब मल्ला (वय ५२) यांच्यासह त्यांचे दोन कामगार जखमी झाले आहेत.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राज नबीसाब मल्ला हे आपल्या कामावर असलेल्या देवकुमार खैरवाल आणि जैमुद्दीन शेख यांना दुचाकीवरून घेऊन मंडणगडच्या दिशेने येत होते. त्यांची दुचाकी होंडा (क्रमांक एमएच ०८ एक्स ७३५७) केळवत घाटातील उताराच्या वळणावर आली असता समोरून येणाऱ्या मारुती ब्रेझा कारने (क्रमांक एमएच १२ झेडएस ५२४७) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.


ही कार आशुतोष अशोक पंढरपूरकर (वय ५४, रा. उजवी भुसारी कॉलनी, पौड रोड, कोथरूड, पुणे) चालवत होते. या धडकेत दुचाकीवरील तिघांनाही दुखापती झाल्या. त्यामध्ये राज नबीसाब मल्ला (वय ५२, रा. पालघर, ता. मंडणगड), देवकुमार मेहलाल खैरवाल (वय २७, रा. महाड, जि. रायगड, मूळ रा. मध्य प्रदेश) आणि जैमुद्दीन आनु शेख (वय ४२, रा. सौमित्रनगर, बायपास, ठाणे) यांचा समावेश आहे.


या अपघातप्रकरणी राज मल्ला यांचे भाऊ मेहबूब नबीसाब मल्ला (वय ४९, रा. पालघर, ता. मंडणगड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार मंडणगड पोलीस ठाण्यात १२ नोव्हेंबर रोजी गुन्हा रजिस्टर क्रमांक १३३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम २८१, १२५ (अ), १२५ (ब) तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ प्रमाणे कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


केळवत घाटातील वळणावर झालेल्या या अपघातामुळे घाटातील वाहतुकीच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. या प्रकरणी मंडणगड पोलीस पुढील तपास करीत आहेत.