Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

खेड : बहिरवली गावात घराला आग लागून लाखोंचे नुकसान

banner 468x60

तालुक्यातील बहिरवली नंबर २ येथे बुधवारी दि.२२ रोजी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास अशफाक बने यांच्या घराला घराच्या वायरींगमध्ये शॉर्ट सर्किटमुळे जळून खाक झाले आहे.

यावेळी घरात कोणीही नसल्याने कोणालाही इजा झाली नसली तरी लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

बहिरवली नंबर २ मधील अशफाक बने यांच्यावर हृदयरोग शस्त्रक्रिया डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात मंगळवारी दि.२१ रोजी दुपारी झाली आहे. त्यांची पत्नी व मुलगी हे त्यांच्या सोबत डेरवण येथे गेले आहेत.

त्यांच्या घराला टाळे लावून ते तिकडे गेले असून बुधवारी दि.२२ रोजी सकाळी साडे दहा वाजताच्या सुमारास घरातील वयरींगमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागली.

आगीने घराला वेढा घातला. ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्यासाठी प्रयत्न केला मात्र तोपर्यंत पूर्ण घर जळून गेले होते.

खेड नगर परिषदेच्या अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले होते. परंतू संपूर्ण घर जळाले होते. या घटनेत अशफाक यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *