Breaking News
मंडणगडचा पाणीप्रश्न आता इतिहासजमा होणार! 41 कोटी 69 लाखांच्या नळपाणी योजनेचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते भूमिपूजन, पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून योगेश कदमांचे कौतुक; नागरिकांना दिवाळीची मोठी भेट दापोली : भाजपला धक्का! युवा मोर्चाचे शहराध्यक्ष विराज खोत यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश, पक्षातील अपमानास्पद वागणुकीचा आरोप करत दिला होता राजीनामा राजापुरात गोवा बनावटीच्या दारूची तस्करी करणारा 26 वर्षीय तरुण जेरबंद, 83 हजारांचा मुद्देमाल जप्त देवरुख : आंबव येथील अपघातातील गंभीर जखमी केतन मोहिते यांची मृत्यूशी झुंज अपयशी, उपचारादरम्यान निधन चिपळूण : दोन दुचाकींची समोरासमोर 56 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

मंडणगडचा पाणीप्रश्न आता इतिहासजमा होणार! 41 कोटी 69 लाखांच्या नळपाणी योजनेचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते भूमिपूजन, पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून योगेश कदमांचे कौतुक; नागरिकांना दिवाळीची मोठी भेट

banner 468x60

मंडणगड शहरातील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला पाणीप्रश्न आता कायमस्वरूपी सुटण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडले आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त अमृत २.० अभियानांतर्गत मंजूर झालेल्या तब्बल ४१ कोटी ६९ लाख रुपये खर्चाच्या महत्त्वाकांक्षी नळपाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते मंगळवारी (दि. १० नोव्हेंबर) करण्यात आले. या योजनेमुळे मंडणगड शहरातील नागरिकांना नियमित, मुबलक आणि शुद्ध पाणीपुरवठा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विशेष म्हणजे, भारजा नदीवरून पाणी उचलून प्रतिमाणसी दररोज १३५ लिटर पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे.


या भूमिपूजन सोहळ्याला दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झालेले रत्नागिरीचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी या योजनेचे श्रेय महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला दिले. योगेश कदम यांच्या अथक प्रयत्नांमुळे मंडणगडकरांना दिवाळीची मोठी भेट मिळाल्याचे सांगत त्यांनी कदम यांचे कौतुक केले.

या महत्त्वपूर्ण प्रकल्पामुळे मंडणगडची प्रदीर्घ पाण्याची समस्या कायमस्वरूपी सुटणार असून नागरिकांना हक्काचे शुद्ध आणि मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे.

या सोहळ्यात दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी होत पालकमंत्री उदय सामंत यांनी, राज्यमंत्री योगेश कदम यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच नागरिकांना ही दिवाळीची अविस्मरणीय भेट मिळाल्याचे गौरवोद्गार काढले.

एखाद्या लोकप्रतिनिधीने मंत्री झाल्यानंतर आपल्या मतदारसंघाचा कायापालट कसा करावा, याचा वस्तुपाठ दापोली मतदारसंघात पाहायला मिळतो असे सांगत उदय सामंत यांनी योगेश कदम हे थेट कार्यकर्त्यांच्या घरापर्यंत पोहोचून काम करणारे नेते असल्याचे नमूद केले.

भूमिपूजन प्रसंगी मार्गदर्शन करताना योगेश कदम यांनी कामाच्या गुणवत्तेबाबत आणि कालमर्यादेबाबत अत्यंत ठाम भूमिका मांडली. मंडणगड ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर झाल्यानंतर शहरात पायाभूत सुविधांचा मोठा अभाव होता.

सलग अडीच वर्षे केलेल्या पाठपुराव्यामुळे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्याने हा निधी खेचून आणल्याचे योगेश कदम यांनी सांगितले. जलशुद्धीकरण केंद्र व टाकीसाठी आवश्यक असणारी आरोग्य विभागाची जागा मिळण्याबाबतचा चार वर्षांचा तिढाही अवघ्या काही दिवसांत सोडवण्यात आला.

हे काम मार्च २०२७ पर्यंत दिलेल्या मुदतीतच पूर्ण झाले पाहिजे, गुणवत्तेशी कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही आणि या कामावर प्रशासन व लोकप्रतिनिधींचे थेट बारीक लक्ष राहील, अशी सक्त ताकीद त्यांनी कंत्राटदारांना दिली.

सध्या शहरात जुन्या वाहिन्यांमधील गळतीमुळे दर चार ते पाच दिवसांआड केवळ अर्ध्या भागाला पाणीपुरवठा होत होता. या नव्या योजनेमुळे संपूर्ण चित्रात आमूलाग्र बदल होणार आहे.

या प्रकल्पासाठी केंद्र सरकारचा ५० टक्के (२०.८५ कोटी), राज्य सरकारचा ४५ टक्के (१८.७६ कोटी) आणि नगरपंचायतीचा ५ टक्के (२.०८ कोटी) असा एकत्रित निधी खर्च केला जात आहे. योजनेअंतर्गत भारजा नदीवर जॅकवेल उभारून २.५० एमएलडी क्षमतेचे आधुनिक जलशुद्धीकरण केंद्र उभारले जाईल.

तेथून नागरिकांना दररोज प्रतिमाणसी १३५ लिटर शुद्ध पाणी पुरवले जाणार आहे. पाण्याच्या साठवणुकीसाठी ३.२४ लाख लिटरची मुख्य संतुलन टाकी उभारण्यासह शिवाजी नगर, दुर्ग वाडी, गांधी नगर आणि कोंझर या भागात नव्या टाक्या बांधल्या जातील. शहरात ३५.२८ किलोमीटर लांबीचे वितरण जाळे अंथरून २,८४० घरगुती व ३१६ व्यावसायिक नळजोडण्या दिल्या जाणार आहेत.

भविष्यातील विजेची बचत व्हावी यासाठी १५० किलोवॅट क्षमतेचा पर्यावरणपूरक सौर ऊर्जा प्रकल्प बसवण्यात येणार असून, या प्रकल्पामुळे वर्ष २०५६ पर्यंत म्हणजेच पुढील ३० वर्षांची पाण्याची गरज पूर्ण होणार आहे.

या सोहळ्यास जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता केंद्रे, पंचायत समिती सभापती प्रणाली चिले, शशिकांत चव्हाण, प्रताप घोसाळकर, जिल्हा परिषद सदस्य सचिन धाडवे, उपसभापती दीपक मालुसरे, दापोली नगराध्यक्ष कृपा घाग, माजी नगराध्यक्ष राजू पेटकर यांच्यासह स्थानिक नगरसेवक, नगरसेविका, विविध पदाधिकारी, शासकीय अधिकारी आणि मंडणगडकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *