Breaking News
देवरुख : आंबव येथे रस्त्याच्या कडेला बेशुद्धावस्थेत आढळला तरुण, उपचारादरम्यान मृत्यू, फिटचा झटका आल्याने डोक्याला दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती रत्नागिरीच्या कोकणनगरमध्ये घरफोडी, 4 लाख 72 हजारांचे सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास संगमेश्वर : कडवई प्राथमिक आरोग्य केंद्र समस्यांच्या विळख्यात, धोकादायक इमारतीचा स्लॅब कोसळण्याच्या स्थितीत संगमेश्वर : नाणीज येथे प्रवासादरम्यान प्रकृती बिघडली, 28 वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू, मावस बहिणीच्या साखरपुड्यासाठी गेला होता कुटुंबासोबत चिपळूण : 18 वर्षीय तरुणी बेपत्ता, अपहरणाचा गुन्हा दाखल, मोबाईलवर चॅटिंग करण्याच्या कारणावरून वडिलांनी दिली होती समज, घरातून निघून गेल्यानंतर तरुणीचा शोध सुरू

चिपळूण : कुंभार्ली घाटात ट्रक आणि एसटीचा अपघात

banner 468x60

ट्रकने एस्टी बसला मागून धडक दिल्याची घटना कुंभार्ली घाटात रविवारी घडली. यामध्ये एस्टी बसचे नुकसान झाले असून या अपघात प्रकरणी ट्रक चालकावर अलोरे-शिरगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महावीर यल्लपा पुजारी (२६, कर्नाटक) असे गुन्हा दाखल झालेल्या ट्रक चालकाचे नाव आहे. याबाबतची फिर्याद नवनाथ शांताराम गायकवाड यांनी दिली आहे.

महावीर पुजारी हा त्याच्या ताब्यातील ट्रक कुंभार्ली घाटातून घेऊन जात असताना तो एका वळणावर आला असता त्याने ट्रक भरधाव वेगात चालवून एस्टी बसला पाठीमागून उजव्या बाजूस जोरदार धडक दिली.

यात एस्टी बसचा मागील बंपर तुटला आहे. तसेच खिडकीची काच फुटून नुकसान झाले आहे. या अपघात प्रकरणी महावीर पुजारी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *