Breaking News
देवरुख : आंबव येथे रस्त्याच्या कडेला बेशुद्धावस्थेत आढळला तरुण, उपचारादरम्यान मृत्यू, फिटचा झटका आल्याने डोक्याला दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती रत्नागिरीच्या कोकणनगरमध्ये घरफोडी, 4 लाख 72 हजारांचे सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास संगमेश्वर : कडवई प्राथमिक आरोग्य केंद्र समस्यांच्या विळख्यात, धोकादायक इमारतीचा स्लॅब कोसळण्याच्या स्थितीत संगमेश्वर : नाणीज येथे प्रवासादरम्यान प्रकृती बिघडली, 28 वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू, मावस बहिणीच्या साखरपुड्यासाठी गेला होता कुटुंबासोबत चिपळूण : 18 वर्षीय तरुणी बेपत्ता, अपहरणाचा गुन्हा दाखल, मोबाईलवर चॅटिंग करण्याच्या कारणावरून वडिलांनी दिली होती समज, घरातून निघून गेल्यानंतर तरुणीचा शोध सुरू

चिपळूण : दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर अतिप्रसंग प्रकरण, तरूणाला पुन्हा 2 दिवसांची पोलीस कोठडी

banner 468x60

दहावीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीवर एका नराधमाने अतिप्रसंग केल्याची घटना सावर्डे पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडली होती.

याप्रकरणी पोलिसांनी त्या नराधमाला अटक केली होती. न्यायालयाने त्याला सुनावलेली 4 दिवसांची कोठडी मंगळवारी संपताच त्याला पुन्हा दोन दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे.

पीडित मुलीच्या मोबाईलवर हा नराधम संपर्क करत असे. हा फोन ती टाळत असतानाही तो सतत फोन करत असे. हा नराधम मुंबईतून सावर्डे परिसरात दाखल झाला.

तसेच बोलायचे असल्याचे सांगून पीडित मुलीला त्याने तिच्या घराबाहेर बोलावले व जबरदस्तीने गाडीवर बसवून तिला त्याच्या मित्राच्या घरी आणले. तिथे त्याने त्या पीडित मुलीवर अतिप्रसंग केला होता. या प्रकरणी त्या नराधमाला सावर्डे पोलिसांनी अटक केली होती.

त्याला न्यायालयात हजर केले असता 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. मंगळवारी ही कोठडी संपताच त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले असता आणखी 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

दरम्यान, या गुन्ह्यात सहकार्य करणाऱ्या एका तरुणालाही पोलिसांनी अटक केली असून त्यालाही 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *