Breaking News
रत्नागिरी : मित्रांसोबत क्रिकेट खेळत होता, अचानक चक्कर येऊन कोसळला 35 वर्षीय तरुणाचा मृत्यू खेड : शिवाजीनगरमध्ये रस्त्यावरील खड्ड्याची तात्पुरती मलमपट्टी, कायमस्वरूपी दुरुस्ती कधी? चिपळूण : 49 वर्षीय व्यक्तीची आत्महत्या, सावर्डे पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद खेड : मंत्री योगेश कदम यांचा पीए असल्याचे भासवून 5 हजारांची फसवणूक, खेडमध्ये गुन्हा दाखल, मंत्र्यांची भेट घडवून देण्याचे आणि काम करून देण्याचे दिले होते आश्वासन, रविराज चिखले याच्याविरोधात कारवाईची नोंद दापोली : तीन प्रकल्पांविरोधात संघर्ष पेटणार! प्रकल्प रद्द करण्यासाठी युवा रोजगार जनहक्क संघर्ष संघ आक्रमक

रत्नागिरी : वृद्ध महिलेसह नातवाला मारहाण, तिघांविरुद्ध गुन्हा

banner 468x60

पुरफाटा (ता. संगमेश्वर) येथे जमिन जागेच्या वादातून वृद्ध महिलेला व फिर्यांदी यांना घरात घुसून तिघांनी मारहाण केली. देवरुख पोलिस ठाण्यात तीन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राहूल राठोड, निलम राठोड, संतोष राठोड (रा. पुरफाटा, ता. संगमेश्वर) अशी संशयितांची नावे आहेत. ही घटना मंगळवारी (ता. ४) सायंकाळी साडेसातच्या सुमारास पुरफाटा येथे घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी साहिल रमेश रसाळ (वय २२, रा. पुरफाटा, संगमेश्वर) यांचे व संशयिताचे जमिन जागेचे वाद आहेत.

या रागातून संशयितांनी फिर्यादी यांच्या आजीला घरात घुसून मारहाण करत होते. फिर्यादी साहिल रसाळ हे तेथे गेले असता संशयित राहुल राठोड यांने त्यांच्या डोक्यात रॉड मारला तर निलम राठोड यांनी दांडक्याने पाठीवर व डाव्या खांद्यावर मारहाण केली.

तर संशयित संतोष राठोड याने कानाखाली मारुन दुखापत केली. या मारहाणीत साहिल व पुष्पा शंकर रसाळ दोघे जखमी झाले.

या प्रकरणी साहिल रसाळ यांनी देवरुख पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास देवरुख पोलिस अमंलदार करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *