Breaking News
दापोली : मद्यधुंद कारचालकाची पादचाऱ्यांना धडक, दोघे गंभीर जखमी, कुंभवे शिगवणवाडी येथील घटना देवरुख : आंबव येथे रस्त्याच्या कडेला बेशुद्धावस्थेत आढळला तरुण, उपचारादरम्यान मृत्यू, फिटचा झटका आल्याने डोक्याला दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती रत्नागिरीच्या कोकणनगरमध्ये घरफोडी, 4 लाख 72 हजारांचे सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास संगमेश्वर : कडवई प्राथमिक आरोग्य केंद्र समस्यांच्या विळख्यात, धोकादायक इमारतीचा स्लॅब कोसळण्याच्या स्थितीत संगमेश्वर : नाणीज येथे प्रवासादरम्यान प्रकृती बिघडली, 28 वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू, मावस बहिणीच्या साखरपुड्यासाठी गेला होता कुटुंबासोबत

रत्नागिरी : सेक्स्टॉर्शन करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या, पोलिसांची धडक कामगिरी

banner 468x60

अनोळखी हिंदी भाषिक इसमाने व्हॉट्‌सअपवर व्हाईस कॉल केला. व्हॉईस कॉल संपताच त्या इसमाने मॉर्फ केलेले फोटो पाठवले आणि ते फोटो त्या व्यक्तीच्या फेसबुक अकाउंटवरील मित्रांना पाठवण्याची धमकी दिली आणि त्या बदल्यात गुगल पेच्या माध्यमातून 30 हजार रुपये मागितले.

या प्रकरणाचा तपास खेड पोलीसांनी करताना राजस्थानमधील फतेहपूर येथून ताब्यात घेऊन अटक केली आहे. चौकशीमध्ये तो आरोपी सेक्स्टॉर्शनच्या माध्यमातून आपला उदरनिर्वाह करत असल्याचे निष्पन्न झाले.

ही घटना घडल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी राजन सस्ते यांच्या मार्गदर्शनाखाली खेड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी नितीन भोयर यांनी आपल्या पथकासह तपास सुरु केला.

त्या हिंदी भाषिक इसमाला केलेल्या ऑनलाईन मनीट्रान्स्फरचा कसून तपास करण्यात आला. त्यावरुन तो आरोपी मेहजर अली इक्बाल हुसेन (रा. फतेहपुर, राजस्थान) असे त्याचे नाव असल्याचे उघडकीस आले. त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक राजस्थानला पाठवण्यात आले. मात्र तेथून तो आरोपी फरारी झाल्याचे पोलीसांना कळले.

पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे त्याचा ठावठिकाणा शोधला आणि मेहजर अली इकबाल हुसेन याला अटक केली. गुन्ह्यातील शंभर टक्के रक्कम परत मिळवण्यात पोलीसांना यश आले. तपासामध्ये हा आरोपी सेक्स टॉर्शनच्या माध्यमातून उदरनिर्वाह करत असल्याचे उघडकीस आले.

ही कामगिरी प्र.पोलीस निरीक्षक नितीन भोयर, पोलीस कॉन्स्टेबल वैभव ओहोळ, पोलीस कॉन्स्टेबल कृष्णा बांगर यांनी केली. पोलीसांनी आरोपीकडील 2 मोबाईल आणि 4 सीमकार्ड जप्त केली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *