Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

रत्नागिरी : वाळूमाफियावर कारवाई करण्याच्या अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

banner 468x60

संगमेश्वर तालुक्यातील करजुवे सुतारकोंड विचारेवाडी आणि वातवाडी तसेच रत्नागिरी तालुक्यातील काळबादेवी येथे अवैधरित्या वाळूउत्खनन सुरु आहे.

वाळूमाफियांचा उच्छाद सुरु आहे. याकडे अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे यांनी गांभिर्याने लक्ष वेधले आहे. संगमेश्वर तहसीलदार, रत्नागिरी तहसीलदार तसेच खनिकर्म विभागाला चौकशी करुन कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

वाळू उत्खननाची परवानगी नसताना बेकायदेशीररित्या जिल्ह्यात वाळूउत्खनन सुरु आहे. संगमेश्वर तालुक्यातील करजुवे सुतारकोंड विचारेवाडी आणि वातवाडी येथे दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उत्खनन सुरु आहे.

वाळूमाफिया अवैधरित्या वाळूउत्खनन करत आहेत. स्थानिक प्रशासनाने मात्र डोळ्यांवर प‌ट्टी बांधली असल्यामुळे वाळूउत्खनन दिसत नाही. रत्नागिरी तालुक्यातील काळबादेवीमध्येही हाच प्रकार सुरु आहे.

काळबादेवी परिसरात बेसुमार वाळू उत्खननसुरु आहे. या सर्व वाळूमाफियांच्या अवैध वाळूउत्खननाची गांभिर्याने दखल अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे यांनी घेतली आहे.

संगमेश्वर तहसीलदार आणि रत्नागिरी तहसीलदार यांना संबंधित वाळूउत्खननावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच खनिकर्म विभागालाही प्रत्यक्ष त्याठिकाणी जाऊन पाहणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *