Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

रत्नागिरी : कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, मुंबई-गोवा महामार्गावरील वांद्री सप्तलिंगी येथील घटना

banner 468x60

मुंबई-गोवा महामार्गावरील वांद्री सप्तलिंगी येथे कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाला. हा अपघात बुधवारी सायंकाळच्या सुमारास घडला.

किरण विचारे असे मृत्यू तरुणाचे नाव आहे. किरण हा वरवडे येथील असल्याचे समजते. तो आंबेड बुद्रुक येथील पोस्टाचा कर्मचारी असून काम आटोपून तो रत्नागिरीच्या दिशेने जात होता.

गोव्याहून मुंबईच्या दिशेने कंटेनर निघाला होता. यावेळी वांद्री सप्तलिंगी येथे कंटेनर चालक एका गाडीला ओव्हरटेक करत असताना.

समोरून दुचाकी (एमएच-०८-बीए-८५०४) ने येणाऱ्या किरण विचारे याला जोरदार धडक दिली. यामध्ये किरण दुचाकीसह कंटेनरच्या पुढील चाकाखाली सापडला. यातच त्याचा मृत्यू झाला.  अपघाताची माहिती समजताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.

वांद्री पोलिस पाटील सुनील शिगवण यांनी संगमेश्वर पोलिसांना याची माहिती देताच संगमेश्वरचे पोलिस निरीक्षक बगळे, पोलिस अंमलदार राजेश शेलार, सहायक पोलिस

उपनिरीक्षक प्रशांत शिंदे, हेड कॉन्स्टेबल सतीश कोलगे, अंमलदार मुजावर, अंमलदार पवार, हेड कॉन्स्टेबल सचिन जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा पंचनामा करण्याचे काम सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *