Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

खेड : पोलिसांची धडक कारवाई खेड पोलिसांच्या सतर्कतेने मुली पालकांच्या ताब्यात

banner 468x60

शहरातील एका कनिष्ठ महाविद्यालयात शिकणाऱ्या दोन अल्पवयीन शाळकरी मुलींचे अपहरण झाल्याची तक्रार पोलीस स्थानकात दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली.

शोधमोहिमेनंतर मडगाव येथून दोन्ही अल्पवयीन शाळकरी मुलींना ताब्यात घेवून त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. खेड पोलिसांच्या तत्परतेचे सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे.

शहरातील एका कनिष्ठ महाविद्यालयात शिकणाऱ्या १६ व १३ वयोगटातील दोन शाळकरी मुली घरी परतल्या नव्हत्या. या दोघींचा बाजारपेठेसह रेल्वेस्थानक, बसस्थानक, भरणे, खवटी व आजूबाजूच्या परिसरात शोध घेवूनही थांगपत्ता लागला नव्हता. अखेर एका मुलीच्या पालकाने अपहरण झाल्याची तक्रार पोलीस स्थानकात नोंदवली होती.


पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांनी ही बाब गांभिर्याने घेत तपासाला गती दिली. या दोन्ही मुली गोवा बघण्यासाठी रेल्वेगाडीने मडगाव येथे गेल्या होत्या. पोलिसांच्या सतर्कतेने या दोन्ही मुलींना तेथून ताब्यात घेत त्यांचे समूपदेशन करून पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.

जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, पोलीस उपविभागीय अधिकारी राजन सस्ते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन भोयर व पथकाने कामगिरी यशस्वी पणे केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *