शृंगारतळीत उद्या मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन

banner 468x60

गुहागर (प्रतिनिधी) लाईफकेअर हॉस्पिटल चिपळूण, फ्लाईट एज्युकेशनल अँड चॅरिटेबल ट्रस्ट आणि ए.एस.जी. पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट शृंगारतळी

यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत अस्थिरोग तपासणी शिबिराचे आयोजन शनिवार दिनांक १६ डिसेंबर २०२३ सकाळी १०.०० ते ०२.०० या वेळेत ए.एस्.जी. पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट,सिंडीकेट- कॅनरा बँकेच्या वर,शृंगारतळी येथे करण्यात आले आहे.

या शिबिराला येणाऱ्या रुग्णांनी जमिनीवरून उठताना व पायर्‍या चढ उतार करतांना गुडघे दुखणे, सांध्यांना सूज येऊन ते लालसर किंवा जाम /गरम वाटणे, दुखणाऱ्या गुडघ्यातून /सांध्यातून कट कट असा आवाज येणे, सकाळी गुडघे किंवा ईतर सांधे आखडणे, हाडांमधील कॅल्शिअम कमी होणे, इतर सांधेदुखी आजार, गुडघे दुखी, पाठ दुखी, मान दुखी, कंबर दुखी, संधीवात, सायटीका असे आजारांनी त्रस्त असणाऱ्या रुग्णाने अस्थिरोग तज्ञांचा सल्ला घ्यावा. तसेच शिबिरात येणाऱ्या रूग्णांना रक्ताच्या तपासणी व एक्स-रे वर 30 % सवलत, सवलतीच्या दरात सांधेरोपण शस्त्रक्रिया असे लाभ मिळणार आहेत. या शिबिराला अस्थिरोग व सांधेरोपण तज्ञ, नामवंत डॉक्टर हुजैफा इसहाक खतीब तपासणी करणार आहेत. अधिक माहितीसाठी मो.9657898382/ 9309338035 संपर्क साधावा.

       

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *