Breaking News
दापोली : चिखलगावच्या लोकमान्य टिळक विद्यालयाच्या ‘स्किल बॉक्स’ उपक्रमाची शासनस्तरावर दखल, चिखलगावच्या लोकमान्य टिळक विद्यालयाचा गौरव, शिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे यांच्या पुढाकारातून उपक्रमाचा विस्तार चिपळूण : 23 वर्षीय तरुणाची आत्महत्या चिपळूण : तळवडेच्या छोट्याशा गावातून डॉक्टर होण्यापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास, शाळेत शिपाई म्हणून राबणाऱ्या वडिलांचं स्वप्न मुलाने केलं पूर्ण! कष्टाचं चीज झालं, शुभम कोकरे बनले डॉक्टर! गुहागर-चिपळूण मार्गावरीलघोणसरे चिवेली फाट्यावर अपघात, महिला गंभीर जखमी खेड : अनोळखी पुरुषाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला, परिसरात खळबळ

गुहागर-चिपळूण मार्गावरीलघोणसरे चिवेली फाट्यावर अपघात, महिला गंभीर जखमी

banner 468x60

गुहागर-चिपळूण मार्गावरील घोणसरे चिवेली फाट्यावर एसटी बसमधून उतरताना एका महिलेला गंभीर दुखापत झाल्याची घटना घडली आहे. बसमधून उतरत असताना महिलेच्या पायावरून बसचे चाक गेल्याने ती गंभीर जखमी झाली. या घटनेमुळे एसटी प्रवासादरम्यान प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित महिला गुहागर तालुक्यातील रहिवासी असून, आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी रुग्णालयात जात होती. यासाठी तिने सकाळी आठ वाजता गुहागर आगारातून सुटणाऱ्या गुहागर-रत्नागिरी एसटी बसने प्रवास सुरू केला होता.

घोणसरे चिवेली फाट्यावर बसमधून खाली उतरत असताना महिलेचा पदर बसच्या दरवाजात अडकल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे. यावेळी बसचे चाक महिलेच्या पायावरून गेल्याने तिला गंभीर दुखापत झाली.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमी महिलेला तातडीने मदत केली. त्यानंतर पुढील उपचारांसाठी तिला डेरवण येथील रुग्णालयात हलविण्यात आले.

दरम्यान, हा अपघात नेमका कसा घडला, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. घटनेच्या नेमक्या कारणाबाबत अधिक माहिती मिळण्याची प्रतीक्षा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *