दापोली विधानसभा मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आला असून, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे दापोली विधानसभा क्षेत्रप्रमुख मुजीब रुमाणे यांच्यासह ३२ गावांतील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या पक्षप्रवेशामुळे दापोली तालुक्यातील राजकीय समीकरणांमध्ये नव्या घडामोडी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
यावेळी खासदार सुनील तटकरे यांनी दापोली तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद पुन्हा पूर्वीप्रमाणे निर्माण करण्याचा निर्धार व्यक्त केला. ते म्हणाले, “दापोली राष्ट्रवादीची पहिल्यासारखी ताकद निर्माण करणार. राष्ट्रवादी काँग्रेसला गृहीत धरल्याशिवाय दापोली तालुक्यात कोणालाही राजकारण करता येणार नाही.”
दापोली तालुक्यात पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर देणार असल्याचे संकेत या वक्तव्यातून मिळाले. मुजीब रुमाणे यांच्यासह विविध गावांतील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने पक्षाला स्थानिक पातळीवर संघटनात्मक बळ मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या पक्षप्रवेश सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, जिल्हा परिषद सदस्य अजय बिरवटकर, दापोली तालुकाध्यक्ष डॉ. जयवंत जालगावकर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष तथा नगरसेविका साधना बोत्रे, रमा बेलोसे आणि मंडणगडच्या नगराध्यक्षा सोनल तेंडुलकर यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
दापोली विधानसभा मतदारसंघात विविध राजकीय पक्षांकडून संघटनात्मक बांधणीवर भर दिला जात असताना, मुजीब रुमाणे यांच्यासह ३२ गावांतील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीतील प्रवेश आगामी काळातील स्थानिक राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे. या पक्षप्रवेशामुळे दापोलीत राष्ट्रवादी काँग्रेसची संघटनात्मक ताकद कितपत वाढते आणि त्याचे राजकीय परिणाम काय होतात, याकडे आता लक्ष लागले आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*














aviator pontos https://www.aviator50238.shop