Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

दापोली : गावतळे-शेरवली मार्गावर बेकायदेशीर दारू विक्री

banner 468x60

दापोली तालुक्यातील गावतळे शेरवली मार्गावर गेले कित्येक वर्षे बेकायदेशीर देशी, विदेशीसह गावठी दारूची विक्री केली जात आहे. मात्र, या बेकायदेशीर दारू विक्रीवर ठोस कारवाई होत नसल्याने नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत.

येथील दारू विक्रीवर आपण अनेक वेळा कारवाई केली आहे, असे उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी सांगतात. मात्र तरीही येथील दारू विक्री बंद झालेला दिसत नाही. त्यामुळे नागरिक उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यपद्धती वर नाराजी व्यक्त करत आहेत.

उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने दापोलीत अनेक वेळा धाडसी कारवाई करून अनेक बेकायदेशीर व्यवसाय बंद पाडले आहेत. मग शेरवली मार्गावरील दारू विक्रीला अभय का?

असा सवाल देखील नागरिक उपस्थित करत आहेत. या बेकायदेशीर दारू विक्रीची रत्नागिरी उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकास माहिती देऊनही कारवाई होत नाही, असे नागरिक सांगतात.

त्यामुळे आता पोलिस हा व्यवसाय बंद करणार का, या पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *