Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

चिपळुण : पत्नीची नदीत उडी घेत, तर पतीची राहत्या घरी आत्महत्या

banner 468x60

तालुक्यातील पिंपळी येथील पती-पत्नीने आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली आहे.

यापैकी पत्नीचा मृतदेह चिपळूण शहरानजीकच्या खेर्डी येथील वाशिष्ठी नदीपात्रात, तर पतीचा मृतदेह पिंपळी येथे त्यांच्या राहत्या घरी आढळून आला.

या आत्महत्यामागचे कारण समोर आलेले नाही. शरद पाटील (वय ४२), स्वाती शरद पाटील (४०, दोघेही सध्या राहणार पिंपळी) असे आत्महत्या केलेल्या मृत पती-पत्नीचे नाव आहे.

शरद पाटील व पत्नी स्वाती पाटील हे दोघे काही दिवसांपासून पिंपळी येथे भाड्याने रहात होते. शरद पाटील यांना कंबरेच्याखाली अपंगत्व आल्याने ते घरीच होते. तर स्वाती पाटील या घरकाम करीत असत.

दरम्यान, शरद पाटील यांनी घरीच विष प्राशन करून आत्महत्या केली, तर पत्नीने वाशिष्ठी नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे.

मंगळवारी सायंकाळी उशिरा पत्नीचा मृतदेह खेर्डी येथील वाशिष्ठी नदीपात्रात आढळून आला. या आत्महत्या कोणत्या कारणातून झाल्या हे अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *