Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

चिपळूण : बहादूरशेख नाक्यातील सर्व गर्डर तोडले

banner 468x60

बहादूरशेख नाका येथील उड्डाणपुलाच्या पिलरवर बसवलेले सर्वच गर्डर तोडण्यात आले आहेत. आता नव्या डिझाईननुसार काम सुरू होणार आहे.

उड्डाणपुलाच्या बांधकामाचे गर्डर ऑक्टोबर २०२३ मध्ये कोसळून झालेल्या अपघातामुळे या टप्यातील कामाचे वेळापत्रक दीर्घकाळासाठी पुढे गेले आहे. आता नव्या डिझाईननुसार कामाची प्रतीक्षा आहे.

राज्य सरकार आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत मुंबई-गोवा महामार्गावरील सर्व कामे पूर्णत्वास जातील, असे आश्वासन मुंबई उच्च न्यायालयाला दिले आहे. या कामात होणाऱ्या विलंबाबाबत वकील ओवेस पेचकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती.

या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने राज्य सरकारला खडसावले होते. मुंबई-गोवा महामार्गावर गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेली रस्त्यांची कामे ३१ डिसेंबर २०२३ पूर्वी पूर्ण होतील, असे केंद्र आणि राज्य सरकारकडून सांगण्यात येत होते. मात्र, ती मुदतही टळून गेली.

पर्यावरणविषयक परवानग्या मिळण्यास झालेला उशीर, भूसंपादनाची रखडलेली कामे, कंत्राटदारांची निष्क्रियता आणि राजकीय इच्छाशक्तीचा अभाव यामुळे महामार्गाची कामे रखडली आहेत.

मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरण आणि दुरुस्तीच्या कामांसह इतर सर्वच गोष्टींची कामे ३१ डिसेंबर २०२४ च्या आत पूर्ण करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. चिपळूणजवळ परशुराम घाटातील धोकादायक आणि आव्हानात्मक कामही पावसाळ्यानंतर झपाट्याने पूर्ण होत आले असून,

घाटातील दोन्ही मार्गिका लवकरच पूर्ण होतील, अशी अपेक्षा आहे. बहादूरशेख नाका येथे गर्डर तोडल्यानंतर निर्माण झालेले टाकाऊ भाग बहादूरशेख नाका येथून हटवण्यात आले आहे. बहादूरशेख नाका येथील उङ्गाणपुलाच्या पिलरवर बसवलेले सर्वच गर्डर तोडण्यात आले आहे.

येथील जागा स्वच्छ करून नव्याने कामाची तयारी सुरू केली आहे. लवकरच कामाला सुरुवात होईल. सद्यःस्थितीत प्राथमिक तयारी सुरू आहे. नव्या डिझाईननुसार उड्डाणपुलाच्या कामाचे नियोजन केले जात आहे. – राजेंद्र कुलकर्णी, उपअभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग, चिपळूण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *