Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

चिपळूण : चिरफाड न करता घशातून माशाचा काटा काढला, अवघड शस्त्रक्रिया यशस्वी

banner 468x60

चिपळूण तालुक्यात डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात अनेक अवघड शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. कॅन्सर रुग्णांसाठी हे रुग्णालय जीवदान ठरलं आहे. अनेक कॅन्सर रुग्ण बरे करण्यात या रुग्णालयातील डॉक्टरांना यश आले आहे.

आता याच रुग्णालयात अशीच एक अवघड शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली. घशात स्वरयंत्राजवळच अडकलेला माशाचा काटा काढण्यात डॉक्टरांना यश आलं आहे. भक्तश्रेष्ठ कमलाकरपंत वालावलकर ट्रस्टचे हे हॉस्पिटल आहे. स्वरयंत्राजवळ अडकलेला माशाचा काटा काढण्याची अत्यंत जटील अशी शस्त्रक्रिया नुकतीच डेरवण येथील वालावलकर रूग्णालयामध्ये यशस्वीरित्या पार पडली.

रूग्णाच्या घशात दोन महिन्यांपूर्वी माशाचा मोठा काटा अडकला होता. त्यानंतर त्याला गिळताना त्रास होत होता. त्यामुळे घशाला सुज येवून त्याला अन्न गिळता येत नव्हते. चिपळुणा मधील डॉ. ओंकार शर्मा यांनी रूग्णाला वालावलकर रूग्णालयामध्ये एमआरआय आणि सीटी स्कॅन करण्यासाठी पाठवले होते.

वालावलकर रूग्णालयामध्ये सिटी स्कॅन करताना असे आढळून आले की, घशात माशाचा काटा स्वरयंत्रानजिक अडकलेला आहे. त्यानंतर डॉ. आनंद जोशी (गेस्टएन्ट्रोलॉजिस्ट सर्जन), सर्जरी विभागाचे डॉ. मानसिंग घाटगे (डीन), डॉ. अविनाश गुरूषे (सर्जन), डॉ. संग्राम दाभोळकर (सर्जन) ईएनटी विभागाचे डॉ. प्रतिक शहाणे (ईएनटी सर्जन) यांनी चर्चा करून शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.

स्वरयंत्रानजिक घशामध्ये अडकलेला काटा काढण्याची अत्यंत अवघड अशी शस्त्रक्रिया यशस्वीरित्या कुठेही चिरफाड न करता दुर्बिणीद्वारे पार पडली. या शस्त्रक्रियेत ४ सेंटीमीटर घशात रूतलेला काटा बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *