Breaking News
दापोली : मद्यधुंद कारचालकाची पादचाऱ्यांना धडक, दोघे गंभीर जखमी, कुंभवे शिगवणवाडी येथील घटना देवरुख : आंबव येथे रस्त्याच्या कडेला बेशुद्धावस्थेत आढळला तरुण, उपचारादरम्यान मृत्यू, फिटचा झटका आल्याने डोक्याला दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती रत्नागिरीच्या कोकणनगरमध्ये घरफोडी, 4 लाख 72 हजारांचे सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास संगमेश्वर : कडवई प्राथमिक आरोग्य केंद्र समस्यांच्या विळख्यात, धोकादायक इमारतीचा स्लॅब कोसळण्याच्या स्थितीत संगमेश्वर : नाणीज येथे प्रवासादरम्यान प्रकृती बिघडली, 28 वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू, मावस बहिणीच्या साखरपुड्यासाठी गेला होता कुटुंबासोबत

खेडमध्ये गुंडाराज मेटे येथे घरात घुसून महिलेचा विनयभंग, मारहाण, महिलेला ‘जिंदगी खराब’ करण्याची धमकी

banner 468x60

खेड तालुक्यात कायद्याचं धाक आहे की नाही असा प्रश्न या घटनेवरून समोर येतोय. खेड तालुक्यातील मौजे मेटे येथे ११ मे रोजी दुपारी एका घरात घुसून कुटुंबाला मारहाण करण्यात आली.

तसेच घरातील महिलेचा विनयभंग करत तिला आणि तिच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी शमशुद्दीन सत्तार बोट ( ४५) यांनी खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

त्यानुसार शोएब अख्तर शमशुद्दीन घारे, इरफान शोएब अख्तर घारे आणि कामिल शोएब या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अख्तर घारे, इरफान शोएब अख्तर घारे आणि कामिल हे तिघे शमशुद्दीन बोट यांच्या घरासमोर आले आणि त्यांना, त्यांच्या मुलींना व आईला शिवीगाळ करून मारण्याची धमकी देऊ लागले.

त्यावेळी फिर्यादी यांची मुलगी या भांडणाचा व्हिडिओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत होती. हे पाहून आरोपी इरफान घारे घरात घुसला आणि त्याने फिर्यादीच्या मुलीला मोबाईल बंद करण्याची धमकी दिली, अन्यथा तिला ‘खल्लास’ करण्याची धमकी दिली.या झटापटीत आरोपी अख्तर घारे याने फिर्यादीच्या आईला जमिनीवर ढकलून दिले.

तसेच, फिर्यादीच्या मुलीच्या अंगावरील कपडे फाटले आणि आरोपी अख्तर घारे याने तिला खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. मारहाणीत तिच्या डाव्या डोळ्याला आणि डोक्याला दुखापत झाली. आरोपींनी तिला शिवीगाळ करत तिची ‘जिंदगी खराब’ करण्याची धमकी दिली.

आरोपी इरफान याने पुन्हा घरात घुसून फिर्यादीच्या मुलीला मोबाईल बंद करण्याची धमकी दिली आणि तिच्याशी झटापट केली. दरम्यान, आरोपी क्रमांक १ आणि ३ यांनी लाकडी दांडके घेऊन धावत येत फिर्यादी शमशुद्दीन बोट यांना खाली पाडले आणि दांडक्याने त्यांच्या पायावर, पाठीवर आणि डोक्यावर मारहाण करून जखमी केले.

तसेच त्यांना लाथाबुक्क्यांनीही मारहाण केली.या घटनेत १८ मे रोजी सायंकाळी जखमी शमशुद्दीन बोट यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. पोलिसांनी याप्रकरणी भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ चे कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), ३५१(३), ३३३ आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे. घरात घुसून मारहाण आणि विनयभंगासारख्या गंभीर गुन्ह्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *