Breaking News
दापोली : दापोलीत मोठा जमीन घोटाळा? वक्फ जमिनींच्या व्यवहारांना वक्फ मंडळाची नोटीस, जमिनींच्या व्यवहारांचा पर्दाफाश होणार? एका सत्ताधारी पक्षाच्या नेत्याच्या कनेक्शनमुळे प्रकरण चर्चेत, 44 जणांना नोटीस, 7 दिवसांत खुलासा करण्याचे निर्देश रत्नागिरी : सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची चौथ्या मजल्यावरून उडी, पतीसह सासरच्या पाच जणांवर गुन्हा, ‘माहेरून फ्लॅट घेण्यासाठी पैसे आणावेत, अन्यथा मुलाचा दुसरा विवाह करून देऊ’, मुलांपासून दूर ठेवल्याचा तक्रारीत आरोप पाच सागरी जिल्ह्यांतील भूमिपुत्रांची एकजूट, ‘सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना रत्नागिरी : ज्येष्ठ पत्रकार जावेद मुजावर यांचे निधन,पत्रकारिता, सहकार क्षेत्रात हळहळ धक्कादायक खेडमध्ये दोन तरुण बेपत्ता, अपहरणाचा संशय, अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हे दाखल

खेड : युवतीवरील लैंगिक अत्याचारप्रकरणी वृध्दाला बेड्या

banner 468x60

खेड तालुक्यातील आवाशी गावात दोन वर्षांपूर्वी घडलेल्या एका युवतीवरील विनयभंग व लैंगिक अत्याचारप्रकरणी संजय आंब्रे (वय 61, रा. आवाशी, ता. खेड) याला पोलिसांनी नुकतीच अटक केली. पीडित युवतीने पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून या प्रकरणाचा पर्दाफाश झाला. आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्यास पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.


विशेष म्हणजे, पीडितेवर अत्याचार करणाऱ्या या वृध्दाला गावकऱ्यांनी ओळखून संताप व्यक्त केला. संजय आंब्रे याला गावकरी वर्गाने चोख शिक्षा देत तोंड काळं करून गावात फिरवत पोलिसांच्या स्वाधीन केलं. यावेळी ग्रामस्थांनी पोलिसांच्या निदर्शनास आणून दिलं की, आरोपीने आपले विकृत कृत्य मोबाईलमध्ये चित्रीतही केलं होतं.


पोलीस अधिकाऱ्यांनी सदर मोबाईल जप्त केला असून त्यामध्ये असलेल्या व्हिडिओंची चौकशी केली जात आहे. प्राथमिक तपासात काही गंभीर बाबी उघडकीस आल्याची माहिती पोलिसांनी दिली.


या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जयवंत गायकवाड करीत आहेत.हा प्रकार उघड झाल्याने संपूर्ण गावात संतापाची लाट उसळली असून, आरोपीवर कठोर कारवाईची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *