Breaking News
दापोली : दापोलीत मोठा जमीन घोटाळा? वक्फ जमिनींच्या व्यवहारांना वक्फ मंडळाची नोटीस, जमिनींच्या व्यवहारांचा पर्दाफाश होणार? एका सत्ताधारी पक्षाच्या नेत्याच्या कनेक्शनमुळे प्रकरण चर्चेत, 44 जणांना नोटीस, 7 दिवसांत खुलासा करण्याचे निर्देश रत्नागिरी : सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची चौथ्या मजल्यावरून उडी, पतीसह सासरच्या पाच जणांवर गुन्हा, ‘माहेरून फ्लॅट घेण्यासाठी पैसे आणावेत, अन्यथा मुलाचा दुसरा विवाह करून देऊ’, मुलांपासून दूर ठेवल्याचा तक्रारीत आरोप पाच सागरी जिल्ह्यांतील भूमिपुत्रांची एकजूट, ‘सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना रत्नागिरी : ज्येष्ठ पत्रकार जावेद मुजावर यांचे निधन,पत्रकारिता, सहकार क्षेत्रात हळहळ धक्कादायक खेडमध्ये दोन तरुण बेपत्ता, अपहरणाचा संशय, अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हे दाखल

खेड: नातुनगर मोहल्यातील तरुणाचा मुंबईत लोकलमधून पडून मृत्यू

banner 468x60

खेड तालुक्यातील नातूनगर-मोहल्ला येथील रहिवासी व मुंबई येथे नोकरीनिमित्त वास्तव्यास असलेल्या नौशाद नूरमोहम्मद कोंडेकर (२२) याचा मुंबई येथील मस्जिद बंदर रेल्वे स्थानकादरम्यान लोकल रेल्वेतून पडून मृत्यू झाला. यामुळे कोंडेकर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.


नूर मोहम्मद कोंडेकर यांचा तो एकुलता एक मुलगा होता. लोकल रेल्वेतून प्रवास करत असताना तोल जाऊन तो खाली पडला.

या घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला.
शनिवारी रात्री उशिरा त्याचा मृतदेह मूळगावी खेड तालुक्यात नातूनगर येथे आणण्यात आला. शनिवारी नातूनगर-मोहल्ला येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

या दुर्घटनेने नातूनगरसह खवटी, तुळशी पंचक्रोशीतून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *