खेड : नारळाच्या झाडावरून पडून तरुणाचा मृत्यू

banner 468x60

नारळाच्या झाडावर नारळ काढण्यासाठी चढलेल्या ३२ वर्षीय तरुणाचा झाडावरून कोसळून मृत्यू झाल्याची घटना २५ मार्च रोजी सकाळी ११:३० वाजण्याच्या सुमारास दयाळ कांजरकोंड येथे घडली.

banner 728x90

नितीन शांताराम झाडेकर रा. कुंभवे सुतार वाडी मूळ गाव दयाळ कांजरकोंड असे त्या मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे.

घराच्या जवळ असलेल्या नारळाच्या झाडावर नारळ काढत असताना अचानक तोल गेल्याने तो जमिनीवर कोसळला त्याला तत्काळ दापोली येथील भागवत हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र त्यास मयत घोषित करण्यात आले.

या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *