Breaking News
दापोली : मद्यधुंद कारचालकाची पादचाऱ्यांना धडक, दोघे गंभीर जखमी, कुंभवे शिगवणवाडी येथील घटना देवरुख : आंबव येथे रस्त्याच्या कडेला बेशुद्धावस्थेत आढळला तरुण, उपचारादरम्यान मृत्यू, फिटचा झटका आल्याने डोक्याला दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती रत्नागिरीच्या कोकणनगरमध्ये घरफोडी, 4 लाख 72 हजारांचे सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास संगमेश्वर : कडवई प्राथमिक आरोग्य केंद्र समस्यांच्या विळख्यात, धोकादायक इमारतीचा स्लॅब कोसळण्याच्या स्थितीत संगमेश्वर : नाणीज येथे प्रवासादरम्यान प्रकृती बिघडली, 28 वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू, मावस बहिणीच्या साखरपुड्यासाठी गेला होता कुटुंबासोबत

खेड : किरकोळ वादातून तरुणाला दांडक्याने मारहाण, मनजुर दाभोळकर विरोधात गुन्हा दाखल

banner 468x60

रत्नागिरी खेड शहरातील तीनबत्ती नाका परिसरातील मुकादम लँडमार्क इमारतीजवळील किरकोळ वादातून एका तरुणावर लाकडी दांडक्याने हल्ला झाल्याची घटना १९ मे रोजी सायंकाळी ५.४५ वाजण्याच्या सुमारास घडली.

या हल्ल्यात खलफान यासीर मनीयार (वय ३०) हा तरुण गंभीर जखमी झाला असून, याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात मनजुर दाभोळकर ( रा. सुखदर, ता. खेड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खलफान वासीर मनीयार (३०, व्यवसाय-ड्रायव्हर, रा. खेड, पीरमोहल्ला, सफा मशिद चौक) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, घटनेच्या वेळी आरोपी मनजुर दाभोळकर हा

फिर्यादीची आई जैतुस मनीयार आणि भाऊ कैफ मनीयार यांना शिवीगाळ करून हाताने मारहाण करत होता. ही माहिती कैफ मनीयार यांनी फोनवरून खलफान यांना दिल्यानंतर ते तात्काळ घटनास्थळी पोहोचले. खलफान यांनी आई आणि भावाला बाजूला करण्याचा प्रयत्न करत असताना, आरोपी मनजुर दाभोळकर याने तेथे असलेला लाकडी दांडका उचलून खलफान यांच्या डोक्यात मारला. या हल्ल्यात खलफान यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

तसेच आरोपीने शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकीही दिली असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. खलफान यांच्या डोक्याला झालेली दुखापत ही आरोपी मनजुर दाभोळकर याने लाकडी दांडक्याने मारल्याने झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी खेड पोलीस अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *